Washing machine shock video viral: अलीकडच्या काळात अनेकांच्या घरी कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. विशेषतः नोकरदार महिलांसाठी वॉशिंग मशीन एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. महिलांना कपडे धुण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही, त्यामुळे महिलांकडून वॉशिंग मशीनच्या वापरावर भर दिला जातो. मात्र, काम सोपे करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या वॉशिंग मशीनमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दररोजच्या वापरातील घरातील उपकरणामुळे असंही घडू शकतं? याचा कोणी विचार देखील केला नसावा. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ याचं जिवंत उदाहरण आहे. वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकत असताना एका व्यक्तीचा क्षणात मृत्यू झाला हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे.

कपडे धूत असताना विजेचा धक्का लागून या व्यक्तीचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही वॉशिंग मशीनचं बटण सुरू असताना त्यामध्ये हात घालताना शंभर वेळा विचार कराल.

कपडे धुताना व्यक्तीने गमावले प्राण, नेमकं काय घडलं?

व्हिडिओमध्ये दिसतं की तो माणूस अगदी नेहमीप्रमाणे वॉशिंग मशीन सुरू करतो, डिटर्जंट टाकतो आणि कपडे टाकण्याआधी पाण्यात हात घालतो. मात्र त्याला कल्पना नसते की मशीनमध्ये आधीपासूनच वीज गळती सुरू आहे. जशीच त्याने पाणी स्पर्श केलं, त्याला जबरदस्त विजेचा धक्का बसला त्याचा जीव गेला. खरंतर पाण्यात हात टाकताच तो मशीनला चिकटून राहिला. काही क्षणातच तो बेशुद्ध पडला आणि त्याचा मृत्यू झाला. हा क्षण इतका भयानक होता की तिथे असलेल्या लोकही हे दृश्य पाहून थरथर कापू लागले.

पाहा व्हिडीओ

दरम्यान, वॉशिंग मशीन जमिनीवर ठेवून कपडे धुणे घातक ठरू शकते. त्यामुळे वॉशिंग मशीनच्या खाली लाकडी स्टँड ठेवावा. त्यामुळे मशीनच्या आजूबाजूला पाणी असले तरी विद्युत प्रवाह वॉशिंग मशीनला स्पर्श करणार नाही. तसेच वॉशिंग मशीनमध्ये हात घालण्यापूर्वी ते पूर्णपणे बंद करा. शक्य असल्यास, त्याची वायर स्वीच बोर्डमधून काढून टाका. या तीन महत्त्वाच्या खबरदारी घेतल्यास अशा प्रकारच्या दुर्घटना व अपघात टाळता येतील.