पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलू नका, अशी सूचना लिहलेली असते. बऱ्याचदा पेट्रोल पंपावरील कर्मचारी ग्राहकांना हे सांगतात. कधी कधी तर यावरुन पंपावर भांडणंही होतात. पण कुणी ऐकलं तर नवलंच. सध्या पेट्रोल पंपावरील एका व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून यात दुचाकीत पेट्रोल भरत असताना दुचाकीस्वाराचा फोन वाजतो त्याच्या खिशातून फोन काढून बोलणार तितक्यात अचानक मोबाईल पेट घेतो.

व्हिडीओत पेट्रोल पंपावर मोबाईल फोन वापरत असताना एका दुचाकीला अचानक आग लागल्याचे दिसून येते. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नागपूर जिल्ह्यातील असल्याचे म्हटले जात आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दुचाकीवर मागे बसलेली व्यक्ती तातडीने दुचाकी सोडून बाजूला उभी राहिली व उपस्थित कर्मचाऱ्यांनी पेट्रोल पंपावर फायर सेफ्टी कॉल सुरू करून आग आटोक्यात आणली. उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. ही धक्कादायक घटना आणि तितकाच भयानक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Power of One News | Nagpur (@powerofonenews)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा लेकीला समुद्रात पोहायला शिकवत होते वडील; पाण्यात टाकताच चिमुकली थेट तळाला, अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ @powerofonenews नामक इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो लोकांनी बघितलं आहे.