Viral video: सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात, अनेकवेळा हे व्हिडीओ मजेदार असतात. दरम्यान एका शिक्षकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही शिक्षक हे विद्यार्थ्यांचे शिक्षक कमी अन् मित्रच जास्त असतात. विद्यार्थी आणि शिक्षाकांमधलं नातं दिवसेंदिवस बदलत चाललं आहे. काही शिक्षक विद्यार्थ्यांना खूप प्रोत्साहन देतात, त्यांच्या कलानं प्रत्येक गोष्ट समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. या शिक्षकानंही हेच केलंय, विद्यार्थ्यांना कठीण जाणारी रसायनशास्त्राची सूत्रं त्यांनी भोजपूरी गाण्याच्या बोलांवर समजून सांगितली आहेत. आता रसायन शास्त्रातील सूत्रं लक्षात नका ठेऊ तर हे गाणं लक्षात ठेवा, म्हणजे सूत्रं आपोआप लक्षात राहील. या शिक्षकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांचं कौतुक होत आहे.

आता अशी लक्षात ठेवा रसायनशास्त्रातील सूत्रं

या व्हिडिओमध्ये एक शिक्षक भोजपुरी गाण्याच्या बोलांवर रसायनशास्त्राचे सूत्र समजावून सांगत आहेत. त्याची स्टाइल लोकांना खूप आवडते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विद्यार्थ्यांसाठी रसायनशास्त्राची ही सूत्रे सोपी व्हावीत म्हणून ते या भोजपुरी गाण्याच्या आधारे शिकवत आहेत. भोजपुरी गाण्यांच्या बोलांमध्ये त्यांनी सूत्र मिसळले आहे. शिक्षकाची ही शिकवण्याची शैली लोकांना आवडू लागली आहे. त्याचबरोबर लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

या व्हिडिओला ३ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याच वेळी, लोक मोठ्या प्रमाणात शेअरही करत आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर (x) छपरा जिल्ह्याच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून त्यावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तुम्हीही पहा हा मजेदार व्हायरल व्हिडिओ.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> अतिशहाणपणा नडला! चक्क मगरीच्या जबड्यात घातलं डोकं; VIDEO चा शेवट पाहून येईल अंगावर काटा

अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘आमच्या काळात असे शिक्षक का नव्हते?’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘विद्यार्थ्यांना शिकवण्याचा हा एक मजेदार मार्ग आहे.’