आजकाल कोणाला कधी हृदयविकाराचा झटका येईल आणि ती व्यक्ती आपल्याला कायमची सोडून जाईल हे सांगणे कठीण झाले आहे. जगभरात अशा घटनांमध्ये कमालीची वाढ झाली असून याबाबतच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यामुळे लोकांमध्ये हृदयविकाराच्या आजाराच्या बाबतीत भीती निर्माण झाली आहे. नुकतीच राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर सर्वच हैराण झाले आहेत. येथील एका इसमाचे लग्नामध्ये नाचत असतानाच निधन झाले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

राजस्थानमधील पाली जिल्ह्यातून हा हृदयद्रावक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की लग्न समारंभात स्टेजवर नाचत असताना एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला आणि तो स्टेजवरच कोसळला. शुक्रवारी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. ४२ वर्षीय अब्दुल सलीम आपल्या पत्नी आणि मुलांसह मेव्हणीच्या लग्नासाठी भैरुघाट पिंजारो का बासमध्ये आले होते. ते पठाण शासकीय विद्यालयात शारीरिक शिक्षण हा विषय शिकवायचे.

Viral Video: दोन बैलांमध्ये झाली खतरनाक झुंज; मारामारी करत घरात घुसले आणि…; पाहा शेवटी कोण जिंकलं

शुक्रवारी त्यांच्या सासरी संगीतचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी अब्दुलही आपल्या नातेवाईकांसह स्टेजवर नाचत होते. मात्र नाचता नाचता अचानकच ते स्टेजवर कोसळले. नातेवाईकांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी त्यांनी काहीही हालचाल केली नाही. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.

अब्दुल यांना आनन-फानन रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार अब्दुल यांचे निधन हृदयविकाराचा झटका आल्याने झाल्याचे सांगण्यात येत असले, तरीही शवविच्छेदनाचा अहवाल मिळाल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. दरम्यान, सध्याच्या घडीला हृदयविकाराचा हलका आल्याने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नुकतंच टेलिव्हिजन अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचाही जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला.