scorecardresearch

Premium

एकावं ते नवलच…! या हॉटेलमध्ये लोक मार खायचे देतात पैसे; जपानमधल्या अजब हॉटेलचा VIDEO व्हायरल

Viral video: जपानमधल्या अजब हॉटेलचा VIDEO व्हायरल

watch waitress slaps customers in japan restaurant know the reason in viral video
या हॉटेलमध्ये लोक मार खायचे देतात पैसे

हॉटेलमध्ये जाऊन जेवायला प्रत्येकालाचा आवडतं. अनेक हॉटेलमध्ये प्रवेश करताच ग्राहकांचे विशेष स्वागत केले जाते. पण जगात एक असे एक हॉटेल आहे जिथे ग्राहक प्रवेश करताच त्यांना कानाखाली मारले जाते. कानाखाली मारण्यामुळे हे हॉटेल जगभर प्रसिद्ध आहे. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण चकित झाला असून तुम्हालाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. अनेक युजर्सनी व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. या हॉटेलमध्ये लोक मार खाण्यासाठी पैसे देतात.

या हॉटेलचे नाव शचिहोकोया-या आहे. हे जपानमधील नागोया येथे आहे. असे म्हणतात की या रेस्टॉरंटमध्ये मार खाण्यासाठी लोक पैसेही देतात. गालावर मारण्यासाठी लोक ३०० जपानी येन म्हणजेच १६९ रुपये खर्च करतात. हॉटेलमध्ये प्रवेश करताच लोकांना कानाखाली मारली जात असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही कानाखाली इतकी जोरदार आहे की लोक स्वतःवर नियंत्रण गमवत आहेत.

Delhi metro catches fire incident video goes viral
दिल्लीतील मेट्रो स्टेशनवरील VIDEO व्हायरल; प्रवासी प्लॅटफॉर्मवर उभे असताना घडलं भयंकर…
Anamika Bishnoi
प्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सरची पतीने गोळी झाडून केली हत्या; व्हिडिओ व्हायरल
as puneri patya said puneri uncle let air out of tires of vehicle which was parked in front of gate
Pune : हे फक्त पुण्यातच घडू शकतं! गेट समोर पार्किंग केल्याने काकाने चक्क गाडीच्या चाकातील हवा सोडली हवा सोडली, व्हिडीओ व्हायरल
Pune man finds red larvae inside water purifier
पुण्यातील व्यक्तीला वॉटर प्युरिफायरमध्ये सापडल्या ‘लाल अळ्या’, व्हायरल व्हिडिओ पाहून संतापले पुणेकर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे रेस्टॉरंट २०१२ मध्ये उघडण्यात आले होते. काही काळानंतर ते बंद होण्याच्या मार्गावर होते, पण नंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि येथे लोकांची मोठी गर्दी होऊ लागली. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> हरणावर हल्ला करण्यासाठी मगरीने डाव साधला अन्…; थरकाप उडवणारा VIDEO होतोय Viral

व्हायरल व्हिडिओवर लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘लोकांना एवढं का मारलं जात आहे?’ दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘जर मला याची किंमत मोजावी लागली तर मी इथे कधीच जाणार नाही.’ त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, ‘ही लाजिरवाणी बाब आहे.’

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Watch waitress slaps customers in japan restaurant know the reason in viral video srk

First published on: 05-12-2023 at 16:27 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×