उन्हाळ्याला सुरुवात होताच लोक उन्हाच्या झळांपासून बचावासाठी वेगवेगळे उपाय शोधत असतात. काही लोक थंड ठिकाणांवर किंवा जंगलांमध्ये फिरायला जातात. तर काही लोक विकेंडला वॉटर पार्कमध्ये पाण्यात एन्जॉय करतात. वॉटर पार्कला या दिवसात अधिक गर्दी असते. पण वॉटर पार्कला जाताना काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. कारण अपघात कधीही होऊ शकतो. यासाठी कुणी आधीपासून तयार नसतो. जेव्हा व्यक्तीला अपेक्षाही नसते तेव्हा विचारही केला नसेल, अशा घटना घडतात. वॉटरपार्कमध्ये आपण मज्जा मस्ती एन्जॉय करण्यासाठी जात असतो, पण हीच मजा कधीकधी आपल्या जीवावर बेतू शकते, असाच एक वॉटरपार्कमधला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन मुली राईडच्या मधोमध अडकलेल्या दिसल्या. या राइड्सवर पाण्याचा प्रवाह चालू ठेवणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, घसरलेली व्यक्ती अगदी सहजतेने खाली जाते. पण आजकाल अनेक वॉटर पार्क उघडले आहेत, जिथे देखभालीच्या नावाखाली काहीच होत नाही. अशाच एका पार्कमध्ये या दोन मुली गेल्या. दोघेही स्लाइडच्या मध्यभागी अडकल्या होत्या. त्या दोघांनाही खाली जाता येत नव्हते. इथ पर्यंत सर्व ठिक होतं पण समस्या पुढे आली जेव्हा वरुन एक तिसरी व्यक्ती अगदी वेगाने खाली आली. या अपघातात एका मुलीच्या पाठीचे हाड मोडले, तर दुसऱ्या मुलीलाही दुखापत झाली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – हरवलेल्या कुत्र्याला शोधण्यासाठी जाहीर केलं १० कोटींचं बक्षीस, कुत्रा सापडताच बक्षीस देण्यास मालकाचा नकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आनंद लुटण्याच्या नादात अनेकांसोबत विचित्र घटना घडतानाही समोर येत आहे. त्यामुळे स्विमिंग पूलच्या पाण्यात मजा करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून यावर भरपूर कमेंट येत आहेत.