Funny video: लग्न म्हटलं की विधी, परंपरा अशा अनेक गोष्टी आल्या. यासोबत मजा मस्तीही आलीच. लग्नात मित्र असतील तर लग्नाची मजा आणखीनच वाढते. सोशल मीडियावर तर असे लग्नातील अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकताच लग्नातील एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये मित्रांनी नवरदेवासोबत केलेली करामत पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. लग्नात तर मित्र अगदी विचित्र मस्करी करताना दिसतात. अनेकदा मित्रांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात, असाच एक लग्नातील कारनामा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

लग्नादरम्यान, वराचे मित्र आनंदी मूडमध्ये असतात आणि मजा करण्याची एकही संधी सोडत नाहीत. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये वराचा मित्र लग्नाच्या वेळी त्याला गुपचूप दारू पाजतात.

मित्र हे नेहमीच एकमेकांची मस्करी करत मजा घेत असतात, मग त्याला वेळ काळ, ठिकाण असं काही लागत नाही. मग ते मित्राचं लग्न का असेना. अशाच मित्रांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वधू आणि वर लग्नाच्या विधीसाठी बसले आहेत. यावेळी नवरदेवाचे मित्र त्याला सॉफ्ट ड्रिंक देतात. परंतु काही वेळातच नवरदेवाच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतात. नवरदेवाचे मित्र त्याला कोल्ड्रिंकची बॉटल देतात. मात्र ते पिल्यावर नवरदेव खूप विचित्र रिअॅक्शन देतो. त्याला समजतं की त्याच्या मित्रांनी कोल्डिंगमध्ये काहीतरी मिसळून दिलं आहे. ते पिताना तो नवरीकडे पाहतो आणि नवरीलाही त्याच्या रिअॅक्शन वरुन ती कोल्ड्रिंक नसल्याचं समजतं.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवरदेवाच्या मित्रांनी कोल्डड्रिंकमध्ये चक्क दारु मिक्स करुन दिली होती. सोशल मीडियावर हा व्हिडीओ _abirbiswas94 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर कमेंट करून लोक नवरदेवाची मस्करी करत आहेत. अशा मित्रांना लग्नातच बोलवायचं नाही. यासोबत इतरही अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.