Viral video: सोशल मीडियावर नवरदेव आणि नवरीचे अनेक असे व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्यात दोघंही लग्नासाठी अतिशय उत्सुक असतात. आपलं लग्न इतरांपेक्षा जरा हटके आणि अविस्मरणीय करण्याची अनेकांची इच्छा असते. यासाठी वधू आणि वर दोन्हीकडून प्रयत्न सुरु असतात. आपल्या लग्नात सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा सगळ्याच कपलचा प्रयत्न असतो. काहीतरी वेगळं हटके करण्याचा नादात हे नको त्या आयडिया वापरतात आणि व्हायरल होतात. सध्या असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ज्यामध्ये नवरदेवाचा डान्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.
लग्नातले अनेक व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून लग्नातील केळवणाचे, उखाण्याचे, मंगलाष्टकांचे व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. सध्याही असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. यात तुम्हाला लग्नातला हटके डान्स पाहायला मिळेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्न समारंभात नवरदेव आपल्या बायकोसाठी डान्स करताना दिसत आहेत. तेनू लेके में जावंगा या गाण्यावर हा नवरदेव जोरदार नाचत आहे. त्यामुळे युजर्स नवरदेवाला खूप ट्रोल करत आहेत.स्वभावाने लाजाळू असलेला वर सुरुवातीला नाचण्यास नकार देतो. त्याच्या कुटुंब आणि मित्रांच्या दबावाखाली, तो नवरीसाठी ‘आज से तेरी’ गाण्यावर नाचतो. नवरदेवाचा डान्स पाहून नवरीही लाजेने लाल होते आणि मोठ्याने हसायला लागते. त्याच्या हावभावांवरून हे स्पष्ट होते की त्यालाही अस्वस्थ वाटत आहे.नवरदेवाचे हावभावही यावेळी बघण्यासारखे आहेत. सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही फनी असतात, जे बघितल्या बघितल्या लोटपोट होऊन हसायला येतं. हा व्हिडीओही त्यातलाच आहे. त्यामुळे तुम्हीही हा व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल यात शंका नाही.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ labkumar7209gmail.c नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकऱ्यांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं म्हंटलंय, “काहीही असुदेत त्यानं तिच्या आनंदासाठी प्रयत्न केला हीच खूप मोठी गोष्ट आहे.” एका यूजरने लिहिले… एक पुरुष आपल्या आवडत्या स्त्रीसाठी काहीही करू शकतो. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…आपल्याला आयुष्यात इतकाच आत्मविश्वास हवा आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले…हा डान्स करतोय पण मला लाज वाटत आहे.