Viral Wedding Invitation: आपला लग्नसोहळा आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण असावा यासाठी अनेकजण वर्षानुवर्षे प्लॅनिंग करतात. लग्नात घालायच्या कपड्यांपासून ते रुखवत आणि जेवणापर्यंत सर्वकाही परफेक्ट असेल असा प्रत्येक कुटुंबाचा प्रयत्न असतो. लग्नपत्रिकांमध्ये सुद्धा बराच अभ्यास करून अमुक डिझाईनचा तमुक रंग आणि अशा अनेक निकषांना पाळून मग एक निर्णय घेतला जातो. एकूण काय तर लग्नात काहीतरी हटके करायची प्रत्येकाचीच इच्छा असते. अशाच एका इच्छेतून साकारलेली लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी सुद्धा या पत्रिकेचा फोटो शेअर करून या वर- वधूच्या क्रिएटिव्हिटीची वाहवा केली आहे.
हर्ष गोएंका यांनी लग्नाच्या आमंत्रणाचा फोटो शेअर करताना “एक फार्मासिस्टच्या लग्नाचे आमंत्रण! आजकाल लोक खूप क्रिएटिव्हि झाले आहेत…,” हे कॅप्शन दिले आहे. यावरून आपल्या लक्षात आलेच असेल की एका फार्मासिस्टच्या सुपीक डोक्यातून आलेली ही संकल्पना आहे. हे लग्नाचे आमंत्रणा तंतोतंत टॅब्लेटच्या पॅकच्या मागील बाजूसारखे दिसते. आणि नेहमीच्या सूचना, रचना आणि घटकांच्या यादीऐवजी, पट्टीमध्ये लग्नाची तारीख, वेळ आणि वधू आणि वरची नावे आहेत. यात रिसेप्शनची तारीख आणि वेळ देखील दिलेली आहे.
पहा फार्मसिस्टची लग्नपत्रिका
Viral Video: माकडानं जिल्हा न्यायाधीशाचा गॉगल हिसकावून काढला पळ, पुढे जे घडलं…
लग्नाच्या आमंत्रणानुसार, इझिलारासन आणि वसंतकुमारी ही वर आणि वधूची नावे आहेत. ५ सप्टेंबर रोजी वेट्टावलम येथील शक्तीवेल थिरुमना महल येथे विवाहबंधनात अडकणार आहेत. “सर्व मित्र आणि नातेवाईक माझ्या लग्नाचा कार्यक्रम चुकवू नका.” असे म्हणत निमंत्रणामध्ये वधू आणि वर यांचे शिक्षण, नोकरी व अन्य तपशील समाविष्ट आहेत.या पोस्टला जवळपास ३७०० लाईक्स, ३७० हून अधिक रिट्विट्स आणि कमेंट्स आहेत.