Dancing Groom Viral Video: सध्या आपल्या देशामध्ये लग्नांचा सीझन सुरु आहे. दररोज सोशल मीडियावर लग्नांच्या किंवा लग्नाशी संबंधित कार्यक्रमांमधील फोटो, व्हिडीओ पाहायला मिळतात. गेल्या काही वर्षांमध्ये लग्नपरंपरेमध्ये अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळते. प्री-वेडिंग ही संकल्पना देशामध्ये पूर्णपणे रुजली आहे. त्याशिवाय लग्नामध्ये डान्सला खास महत्त्व आल्याचेही दिसते. नवरा-नवरा, करवल्या तसेच दोन्ही कुटुंबातील सदस्य या आनंदाच्या क्षणी संगीताच्या तालावर थिरकताना दिसतात. लग्नकार्यातले व्हिडीओ लोक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओची सध्या लोकांमध्ये चर्चा होत आहे.

नवरीला पाहून नवरदेवाने केली भन्नाट डान्स

लग्नाची वरात येताना वरपक्षातील मंडळी नाचताना आपण पाहत आलो आहोत. काही वेळेस त्यांच्यासह खुद्द नवरदेव सुद्धा नाचत असतो. सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे, ज्यात वऱ्हाडींच्या ऐवजी नवराच बेभान होऊन नाचत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला नवरा-नवरी दोघेही मंडपाच्या स्टेजवर उभे असलेले दिसतात. लगेच एक भोजपुरी गाणं सुरु होतं आणि त्यावर नवरदेव थिरकायला लागतो. जमलेल्या नातेवाईक, आप्तेष्टांसमोर डान्स करताना तो नवरीकडे पाहून खास लूक देत असतो. नवऱ्याला नाचताना पाहून नवरीही हसते. पुढे नवरदेव नवरीचा हात हातांमध्ये घेत तिलाही नाचायला लावतात. स्टेजवर मागच्या बाजूल उभी असलेली करवली त्या दोघांकडे पाहून हसत असते.

newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल
what is the right way to wash and store grapes
द्राक्षांवरील जंतू कसे घालवायचे? ‘व्हिनेगर अन् सोडा’ खरंच ठरतो उपयोगी? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
people washing plates in fountain in wedding
Viral Video : लग्नात सजावटीसाठी लावला होता पाण्याचा कारंजा, पण लोकांनी जेवणाची ताटं धुतली, एकदा व्हिडीओ पाहाच

आणखी वाचा – ‘मदर्स डे’च्या दिवशी विमानात झाली Air Hostess मायलेकींची भेट; इंडिगो एअरलाइन्सने शेअर केलेला खास व्हिडीओ पाहिलात का?

@HasnaZarooriHai या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला त्यांनी ‘नवऱ्याला झालेला आनंद पाहण्यासारखा आहे’ असे कॅप्शन दिले आहे. कपड्यांवरुन आणि गाण्यावरुन हा व्हिडीओ उत्तर भारतातील एखाद्या लग्नातला असावा असे लोक म्हणत आहेत. या व्हिडीओला ४ दिवसांमध्ये ३० हजारांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. नेटकरी या व्हिडीओवर कमेंट करत आहेत. अनेकांनी हा व्हायरल व्हिडीओ अन्य यूजर्सना शेअर केला आहे.