जेव्हा एखादा जागरुक नागरिक कोणतीही मोठी दुर्घटना घडताना पाहतो तेव्हा ती टाळण्यासाठी योग्य पाऊल उचलतो. पोलिसांना अशा घटनांची सुचना देतो जेणेकरून पोलिस तातडीने घटना स्थळी पोहचतील आणि मदत करतील. सध्या अशीच एक घटना घडली जेव्हा एका जागरुक नागरिकांला आग लागल्याचे समजते तेव्हा त्याचे कसलाही विचार न अग्निशमन दलाला बोलावले. काही वेळात तिथे अगिशमन दलाच्या गाड्या पोहचल्याही पण त्यानंतर जे घडलं ते ऐकून कोणाला ही विश्वास बसणार नाही.

व्यक्तीचे नाव आहे (कीरन मरे)Kieran Murray जो न्युयॉर्कमध्ये राहतो. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते आहे की, कीरनने स्वत: त्याच्यासह घडलेला प्रसंग सांगितला आहे. कीरनला त्याच्या घरासमोरील इमारतीमध्ये एका घराच्या खिडकीतून आग लागल्यासारखे दिसते. ते पाहून काही विचार न करता तो अग्निशमन दलाला बोलावतो. त्यानंतर थोड्यावेळाने तिथे अग्निशमन दल पोहचते. सायरन वाजत अग्निशमन दलाचा बंब पोहचतो. पण पुढे जे झाले त्याची कल्पना कोणीही केली नसेल.

हेही वाचा – रस्त्यावर उभा होता लोखंडी कंटनेर, क्षणार्धात तयार झाले रेस्टॉरंट, Viral Video पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही

खरचं आग लागली होती का?

जेव्हा अग्निशमन दलाची गाडी घटना स्थळी पोहचते तेव्हा समजते की, आग लागलीच नाही. पण मग किरन जे पाहिले ते काय होते असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर झालं असे कीरनने जे पाहिले ते टिव्हीमध्ये दिसणारे दृश्य होते. टिव्हीमध्ये आग पेटत असल्याचे दृश्य दिसत होते आणि ते त्याने पाहिले होते. दुरून पाहिल्यानंतर त्याला वाटले की, घरात खरंच आग लागली आहे म्हणून त्याने तातडीने अग्निशमन दलाला बोलावले. किरेन व्हायरल व्हिडीओमध्ये सांगतो की, “तो आठ फूटांचा मोठा टिव्ही होता ज्यामध्ये आग लागल्याचे दृ्यश दिसत होते जे पाहून खरचं आग लागली आहे असेल वाटते”.

हेही वाचा – तुम्ही आग्राचा प्रसिद्ध पेठा कधी खाल्लाय का? व्हायरल व्हिडीओ पाहून येऊ शकते उलटी, पुन्हा खाताना शंभर वेळा विचार कराल

लोकांनी कीरनचे केले कौतूक
सोशल मीडियावर या अनपेक्षित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. कित्येकांनी कीरनचे कामानाचे कौतूक केले. भलेही त्याचा अंदाजा चुकीचा असला तरी तो जागरुक नागरिक असल्याचे सांगितले. एकाने सांगितले की, “खरचं आग लागल्यासारखे वाटत आहे. तु योग्य काम केलसं भावा!” दुसरा म्हणाला, “तू योग्य काम केल आहे. भविष्यामध्ये स्वत:ला असे काम करण्यापासून आजिबात अडवू नको”