Titanic Food Menu: टायटॅनिक हा सर्वात आलिशान जहाजाबाबत आणि त्याच्या कथेबाबत सर्वांना माहितच आहे. एका दुर्घटनेमध्ये टायटॅनिक जहाज बुडाले आणि जवळपास १५०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. या १९९७ मध्ये जहाजावर एक चित्रपट देखील तयार करण्यात आला आहे ज्याला जगभरामध्ये पसंती मिळाली होती. टायटॅनिक जहाज बुडाले त्याला १११ वर्ष झाले आहेत. आता पुन्हा हे जहाज सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. पण यावेळी कारण वेगळे आहे. टायटॅनिक जहाजाचा फूड मेन्यूचा ब्रिटनमध्ये £८३ युरो या किंमीतीला लिलाव झाला. असे मानले जाते की, या फूड मेन्यूची शेवटची कॉपी आहे. यावरून समजते की, दुर्घटनेमध्ये जहाज बुडण्यापूर्वी प्रवाशांनी काय खाल्ले होते हे समजते. इंस्टाग्रामवर TasteAtlas ने या मेन्यूचा फोटो शेअर केला आहे.

टायटॅनिक जहाजावरील प्रवाशांनी मृत्यूपूर्वी काय खाल्ले होते?
फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना मेनूमध्ये कॉर्न बीफ, स्पायसी व्हेजीटेबल्स, ग्रील्ड मटन चॉप, बेक्ड जॅकेट पोटॅटो, कस्टर्ड पुडिंग आणि स्पायसी बीफ देण्यात आले होते. यासोबतच गाजर, बीटरूट आणि टोमॅटोही या मेनूमध्ये दिसत होते. व्हायरल झालेल्या मेनूवर १४ एप्रिल १९१२ ही तारीख देखील नोंदवण्यात आली आहे. द्वितीय श्रेणीच्या मेनूमध्ये मासे, ब्रेड, लोणी, फळे, फ्राईड एग(अंडे), फ्राईड पोटॅटो(बटाटा), चहा आणि कॉफी यांचा समावेश होता. याशिवाय रात्रीच्या जेवणात त्यांना सूप, ब्रेड, ब्राऊन ग्रेव्ही, सॉस, मिठाई, फळे, भाज्या, भात आणि चहा देण्यात आला. जहाज बुडण्यापूर्वी द्वितीय श्रेणीतील प्रवाशांनी ख्रिसमस पुडिंगचा आस्वादही घेतल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा – दुचाकी चालवताना कंबर दुखू नये म्हणून तरुणाने केला हटके जुगाड; पाहा व्हायरल व्हिडीओ

टायटॅनिक जहाजावर ३,५०० पैकी १५०० प्रवाशांचा झाला होता मृत्यू
या अपघातात सुमारे १५०० जणांना जीव गमवावा लागला. तसेच शेकडो लोक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात १४ एप्रिल १९१२ रोजी झाला होता. टायटॅनिकची क्षमता ३,५०० प्रवासी होती. १९१२ मध्ये जेव्हा टायटॅनिक जहाज लाँच करण्यात आले तेव्हा या जहाजाला काहीही होणार नाही असे सांगण्यात येत होते. यामध्ये प्रवाशांशिवाय क्रू मेंबर्सचाही मृत्यू झाला होता. जहाजात ४ रेस्टॉरंट्स, दोन लायब्ररी, दोन सलून आणि एक स्विमिंग पूल देखील होता.

हेही वाचा – चक्क रेलिंगला लटकून प्रवाशांनी भरलेल्या रेल्वेच्या डब्यात घुसण्याचा प्रयत्न करतोय ‘हा’ व्यक्ती; व्हिडीओ होतोय व्हायरल

टायटॅनिक हिमखंडावर आदळले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१४-१५ एप्रिलच्या रात्री टायटॅनिकची समुद्रातील एका हिमखंडाशी टक्कर झाली. या अपघाताबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. जहाजाच्या कॅप्टनने हिमखंडाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून जहाजाचा वेग कमी केला नाही असे सांगण्यात येते.