Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. कधी मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात तर कधी थरकाप उडवणारे व्हिडीओ व्हायरल होतात. दरदिवशी अनेक नवनवीन व्हिडीओ समोर येतात. काही व्हिडीओ इतके विचित्र असतात की पाहून धक्का बसतो आणि आपल्याला आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला भर रस्त्यावर विचित्र कृत्य करताना दिसत आहे. ती असं काही करताना दिसते की ते पाहून कोणीही अवाक् होईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ती नेमकं काय करतेय आणि प्रकरण काय आहे, हे समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (what is going on a woman sitting on middle of the road and doing weird things)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक महिला भर रस्त्यावर बसली आहे आणि रस्त्याच्या मधोमध तिने तीन ठिकाणी आग लावली आहे. याशिवाय तिच्याजवळ नारळ, इत्यादी काही सामान सुद्धा आहे आणि ती काहीतरी करताना दिसत आहे. तिला रस्त्यावरील लोकांची पर्वा नाही. ती तिच्या कामांमध्ये मग्न आहे. रस्त्यावरील लोक तिच्याकडे बघताना दिसत आहे. ही पूजा आहे की जादूटोणा, याविषयी आम्ही कोणताही दावा करत नाही पण व्हिडीओवर लोकांनी याला जादूटोणा संबोधले आहे. हा व्हिडीओ कोणत्या शहरातील आहे, याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा : कलेला वय नसते! साडी नेसून नृत्यकौशल्य दाखविणाऱ्या ९५ वर्षीय आजींना पाहा; VIDEO तील ‘सादगी’ जिंकेल तुमचेही मन
@PalsSkit या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ताईने पूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहेत” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हवन सुरू आहे” तर एका युजरने लिहिलेय, “हा जादूटोणा आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “भीतीचे वातावरण आहे”
(लोकसत्ता कोणत्याही प्रकारच्या अंद्धश्रद्धांना समर्थन देत नाही.)