What Women Never Forget: सोशल मीडियावर आजकाल मुलाखतींचे भन्नाट व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. रस्त्यावर, बागेत किंवा कॅफेत गेलेल्या यूट्यूबर्सकडून साधेसे प्रश्न विचारले जातात; पण त्यावर मिळणारी हटके व भन्नाट अशी उत्तरे मात्र प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतात. असाच एक भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…
महिला कितीही गोष्टी विसरल्या तरी एक अशी गोष्ट आहे की, जी त्या कधीच विसरत नाहीत… अगदी वर्षानुवर्षे गेली तरीही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका भन्नाट व्हिडीओमध्ये याच प्रश्नाचं उत्तर एका पुरुषानं इतक्या मजेशीर पद्धतीनं दिलं की, तिथे उपस्थित महिलादेखील खळखळून हसू लागली.
एका यूट्यूबरला नुकतीच एक जोडी भेटली. नेहमीसारख्या गप्पा मारता मारता त्याने पुरुषाला एक भन्नाट प्रश्न विचारला, “महिला सगळं विसरू शकते; पण अशी कोणती गोष्ट आहे, जी ती कधीही विसरत नाही.” तो प्रश्न ऐकताच महिला कुतूहलानं हसत त्याच्या उत्तराची वाट पाहू लागली. दरम्यान, पुरुषानं काही क्षण विचार करून दिलेलं उत्तर इतकं अनपेक्षित होतं की, ते ऐकून तिथल्या सगळ्यांमध्ये हशा पिकला. व्यक्तीनं उत्तर दिल की, “महिला शेजाऱ्यांना दिलेली भांडी कधीही विसरत नाही.”
बस्स! एवढं ऐकताच त्याच्या शेजारी बसलेली महिला इतकी खळखळून हसू लागली की, ती थांबायलाच तयार नव्हती. यूट्यूबरच्या चेहऱ्यावरही आश्चर्याचे भाव होते आणि काही काळासाठी त्यालाही शब्द सुचेनात.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @blacklisted_x3 या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांच्या या मजेदार मुलाखतीनं प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहून लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला. एका युजरने मजेशीर कमेंट केली, “इतकं खरं बोलणं सोपं नसतं रे भाऊ!” तर दुसरा लिहितो, “स्त्रीला तिच्या आवडत्या माणसाच्या चुका विसरता येत नाहीत.” काहींनी ‘धोका’ आणि ‘मनाविरुद्ध वागणूक’ हे उत्तर दिलं. पण त्या व्यक्तीचं साधं, सहज आणि वास्तवाशी जोडलेलं उत्तर मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुलवून गेलं.
लोक म्हणतात की, महिला अनेक गोष्टी मोठ्या सहजतेनं विसरतात; पण काही आठवणी, काही प्रसंग, किंवा काही सवयी कायम त्यांच्या लक्षात राहतात. पण, या पुरुषानं दिलेलं उत्तर खरंच अनेकांना पटणारं आहे. हा व्हिडीओ आता सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.