WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस ज्याप्रमाणे वाढतेय, त्याप्रमाणे याचा गैरवापर करणाऱ्यांची संख्याही वाढतेय. गैरवापराला आळा घालण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आता व्हॉटस अ‍ॅपने संशयास्पद नावे असणारे व्हॉटस अ‍ॅप ग्रुप्स ब्लॉक करण्यास प्रारंभ केला आहे. त्या आक्षेपार्ह नाव असलेल्या ग्रुपमधील प्रत्येक सदस्यावर व्हॉट्स अ‍ॅप बंदी घातली जात आहे. याबाबत सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून अद्याप व्हॉट्स अ‍ॅपने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हिंदुस्थान टाइम्स’च्या वृत्तानुसार, व्हॉट्स अ‍ॅप बॅनची पहिली घटना एका Mowe11 या रेड्डिट (Reddit) युजरने निदर्शनास आणली. विद्यापिठाच्या ग्रुपचे नाव बदलून ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ असं केल्यानंतर मला बॅन करण्यात आल्याचं या युजरने म्हटलं. ‘ग्रुपमधील प्रत्येक सदस्याला कोणतीही कल्पना न देता बॅन करण्यात आलं. याबाबत व्हॉट्सॅपशी संपर्क साधला असता तुम्ही नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई केल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं’ असं या युजरने म्हटलंय. बंदी घातलेल्या त्या सदस्यांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट एका आठवड्यानंतर चालू केले. तसंच अन्य काही व्हॉट्स अॅप वापरकर्त्यांनीही अशीच तक्रार केली आहे. एका ५० सदस्य असलेल्या ग्रुपचं नाव ‘डिसग्सटींग’ असं बदलण्यात आल्यानंतर त्यांनाही बॅन करण्यात आलं. त्या ग्रुपने नाव दुपारी बदललं आणि रात्री ग्रुपमधील सर्व सदस्यांवर व्हॉट्स अ‍ॅप बंदी घातली गेली. नंतर त्या सर्व सदस्यांचे २७ दिवसांनंतर व्हॉट्स अ‍ॅप चालू करण्यात आले.

व्हाटस अ‍ॅपने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. मेसेंजरवरून हेट स्पीच, फेक न्यूज आदींचा प्रचार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे मानले जात आहे. शिवाय आक्षेपार्ह नाव असल्यास आपोआप तो ग्रुप बंद करण्याची प्रक्रिया नव्या अपडेटमध्ये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp reportedly banning groups with suspicious malicious names sas
First published on: 11-11-2019 at 11:43 IST