उन्हाळ्याबरोबर आता आंब्यांचाही सिझन सुरू झाला आहे. गोड, रसाळ आंबे खाण्याची एक वेगळीच मजा आहे. सध्या अनेक जण आंब्यांचा व्यवसाय घरबसल्या करतात. आंब्यांचे फोटो स्टेटसला ठेवताच ग्राहक खरेदी करण्यास उत्सुक होतात. पण, काही जण बाजारात जाऊन आंबे विकत घेणं पसंत करतात. तर आज त्याचसंबंधित सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. पण, या विक्रेत्याकडे गेल्यावर आंबे विकत घेताना कदाचित तुम्हाला वही आणि पेन घेऊन हिशोब करावा लागेल. कारण या विक्रेत्याने दुकानासमोर आंब्यांच्या किमतीचा अनोखा बोर्ड लावला आहे, जो तुम्हाला शाळेच्या आठवणींमध्ये घेऊन जाईल.

सध्या बहुतांश ठिकाणच्या बाजारपेठेत आंबे विकण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक वेळा आंबे विकण्याचे वेगवेगळे प्रकार पाहिले असतील. ज्या विक्रेत्याकडे आंब्यांची किंमत कमी असते तिथे थांबून आपण आंब्यांची चव चाखून पाहतो आणि मग आंबे खरेदी करतो. मात्र, यावेळी एका विक्रेत्याची आंब्याची किंमत सांगण्याची एक अनोखी पद्धत सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही कच्चे आंबे (कैऱ्या) दिसत आहेत. तसेच दुकानासमोर किमतीचा एक बोर्ड लावला आहे, त्यावर नक्की किंमत कशी लिहिली आहे एकदा पोस्टमधून बघा.

हेही वाचा…धक्कादायक! सामान विमानात चढवताना प्रवाशाचे वाद्य दिलं फेकून; एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा ‘हा’ VIDEO पाहाच

पोस्ट नक्की बघा…

तुम्ही पोस्टमध्ये पाहिलं असेल की, गणिताच्या समीकरणाप्रमाणे या एक किलो आंब्याची किंमत लिहिली आहे. शाळेत गणित विषयात आपल्याला वर्गमूळ काढायला सांगितले जायचे. गणितात वर्गमूळ दर्शवण्यासाठी ‘√’ चिन्ह वापरले जायचे. तर या विक्रेत्याने आंब्यांची किंमत ‘√’ या चिन्हात लिहिली आहे, जे पाहून तुम्हीही विचारात पडाल आणि हिशोब कसा करायचा याचा विचार करत बसाल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर ही पोस्ट @ChapraZila या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. अनेक नेटकरी कमेंटमध्ये वर्गमूळ सोडवताना दिसून आले आहेत आणि एक किलो आंब्यांची किंमत ६०, १०० तर काही जण २०० रुपये सांगताना दिसत आहेत. तसेच विक्रेत्याची ही आंबे विकण्याची अनोखी स्टाईल अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.