जगातील सर्वात उंच पर्वत हा जगभरातील गिर्यारोहकांच्या साहस, रोमांच आणि धाडसी मोहिमांसाठी आवडते ठिकाण आहे. जगभरातील गिर्यारोहक एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी येतात. चढाईचा आव्हानात्मक आणि विलक्षण अनुभव आपल्यासह घेऊन जातात. जस जसे गिर्यारोहक उंचावर चढाई करत जातात तेव्हा त्यांच्याकडील अवजड आणि नको असलेल्या वस्तू ते मागे सोडतात जे वर्षांनु वर्षे बर्फात पडून राहतात. आता एका संशोधनातून असे समोर आले आहे की, हे गिर्यारोहक चढाईच्या वेळी केवळ त्यांचे सामान मागे सोडत नाहीत तर त्यापेक्षा काहीतरी गंभीर मागे सोडत आहेत.
नव्या अभ्यासानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती माउंट एव्हरेस्टवर शिंकते किंवा खोकते तेव्हा ते सुक्ष्मजंतू शतकानुशतके बर्फाळ वातावरणात जतन केले जातात.
एव्हरेस्टवर सुक्ष्मजंतू मागे सोडत आहेत गिर्यारोहक
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, ते कठोर सूक्ष्मजंतूंचा गोठलेला वारसा मागे सोडत आहेत, जे उच्च पातळीवरील उंचीवर कठोर परिस्थितीला तोंड देऊ शकतात आणि अनेक दशके किंवा शतकेही जमिनीत सुप्तपणे जीवंत राहू शकतात. हा अभ्यास एव्हरेस्टच्या प्राचीन, बर्फाळ आणि नाजूक वातावरणावर जलद पर्यटनाचा होणारा प्रभाव अधोरेखित करतो.
आर्क्टिक, अंटार्क्टिक आणि अल्पाइन रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, पृथ्वीच्या सर्वात उंच पर्वतावरील गाळांमध्ये आढळणारे सूक्ष्मजीव, ते या पृष्ठभागांवर कसे पोहोचतात आणि अशा अत्यंत उंचीवर ते कसे टिकतात आणि सक्रिय राहतात याबद्दल फार थोडीच माहिती उपलब्ध आहे.
माउंट एव्हरेस्टवरील मातीच्या विश्लेषनातून समोर आली माहिती
“एव्हरेस्टच्या मायक्रोबायोममध्ये मानवी चिन्हे गोठलेली आहे, अगदी त्या उंचीवरही,”
रिसर्च पेपरचे ज्येष्ठ लेखक स्टीव्ह श्मिट सांगतात, संशोधकांनी माउंट एव्हरेस्टच्या उंचीवरील मातीचे विश्लेषण करण्यासाठी पुढच्या पिढीतील जनुक अनुक्रम तंत्रज्ञानाचा (next-generation gene sequencing technology) वापर केला आणि त्यात आढळलेल्या जवळजवळ प्रत्येक आणि कोणत्याही गोष्टीबद्दल नवीन दृष्टीकोन मिळविला आहे.
कठोर परिस्थितीत जिवंत राहू शकतात हे सुक्ष्मजतू
ते सामान्यतः उबदार आणि ओल्या वातावरणात वाढतात. संशोधनात असे दिसून आले की काही सूक्ष्मजंतूंनी अनुकूलता विकसित केली आहे आणि अशा कठोर परिस्थितीत सुप्त स्थितीत टिकून राहण्यासाठी ते पुरेसे लवचिक होते. पृथ्वीवरील सर्वोच्च हवामान केंद्र उभारण्यासाठी २०१९ मध्ये एव्हरेस्टवर गेलेल्या संशोधकांनी मातीचे नमुने गोळा केले होते.
असे केले संशोधन?
जेव्हा त्यांना नमुने प्राप्त झाले तेव्हा त्यांनी मातीतील जवळजवळ कोणत्याही जिवंत किंवा मृत सूक्ष्मजंतूंचे डीएनए ओळखण्यासाठी जनुक अनुक्रम आणि पारंपारिक संवर्धन तंत्र वापरले.
संशोधकांनी सांगितले की. त्यांना आढळलेले बहुतेक मायक्रोबियल डीएनए अनुक्रम कठोर किंवा एक्स्ट्रोमोफिलिक” जीवांसारखेच होते जे यापूर्वी अँडीज आणि अंटार्क्टिकामधील इतर उच्च-उंचीच्या ठिकाणी आढळले होते. जुन्या आणि नवीन अशा दोन्ही पद्धतींचा वापर करून त्यांना आढळणारा सर्वात मुबलक जीव नागनिशिया वंशातील बुरशी होता.
३० लाखांचं पॅकेज सोडून ‘हे’ जोडपं विकतंय समोसे, रोजची कमाई ऐकून व्हाल थक्क!
संशोधनात आढळले मानवी डीएनएसंबधीत सुक्ष्मजीव
पण, त्यांना काही जीवांसाठी सूक्ष्मजीवांचा DNA देखील आढळला ज्यांचा मानवांशी जास्त संबंधित आहे, ज्यात त्वचा आणि नाकातील सर्वात सामान्य जीवाणूंपैकी एक असा स्टॅफिलोकोकस आणि मानवी तोंडात आढळणाऱ्या जीवाणूंपैकी एक असा स्ट्रेप्टोकोकस, या प्रबळ वंशाचा समावेश आहे.
इतर ग्रहांवर आणि चंद्रावर सापडू शकते जीवसृष्टी
त्यांच्या एव्हरेस्टवरील सुक्ष्म प्रभावाचा पर्यावरणावर लक्षणीय परिणाम होईल अशी अपेक्षा संशोधकांना नसली तरी, ते म्हणाले की, “आम्हाला इतर ग्रहांवर आणि थंड चंद्रांवर जीवसृष्टी सापडू शकते. “आम्ही त्यांना आमच्या स्वतःच्या मार्फत दूषित करत नाही आहोत याची काळजी घ्यावी लागेल.”