सोशल मिडियावर सतत काहीना काही विचित्र घटनांचे फोटो व्हिडिओ समोर येत असतात जे सतत चर्चेमध्ये असतात. असेच एक ट्विट सध्या सोशल मिडियावर चर्चेमध्ये आहे. एका महिलेला रॅपिडो ड्रायव्हरने मध्यरात्रीच्या वेळी व्हॉट्सवर मेसेज पाठविल्याचा प्रकार घडला आहे. महिलेने या चॅटचे स्क्रिनशॉट टिव्ट केले आहेत. त्यानंतर ट्विटरवर या घटनेबाबत जोरदार चर्चा होत आहे.

रॅपिडो चालकाने महिलेला केले असभ्य मेसेज

हुस्नपरी नावाने ट्विटवर अकांऊट असलेल्या एका महिलेने हे रॅपिडो ड्रायव्हरने केलेल्या मेसेजचे स्क्रिनशॉट शेअर केले आहे. ट्विटमध्ये महिलेने असा दावा केला आहे की, तिन पिक अपसाठी तिचे लोकेशन व्हॉटअ‍ॅपवर पाठवले होते. पण जेव्हा रॅपिडो ड्रायव्हरने विचित्र मेसेज पाठविण्यास सुरुवात केली तेव्हा तिला धक्का बसला.

Pakistani youTuber viral video
VIDEO: लाइफस्टाइल ब्लॉगरचा उच्छाद थांबेना! पाकिस्तानी यूट्यूबरने बहिणीच्या मृत्यूनंतर केलेलं ‘हे’ कृत्य पाहून प्रेक्षकही भडकले
Raigad, Explosion in company, Mahad MIDC,
रायगड : महाड एमआयडीसीतील कंपनीमध्ये स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर

या माणसाच्या ‘भितीदायक’ वागण्यामुळे ती संतप्त झाली आणि तिने ट्विटरवर तिच्या फॉलोअर्ससोबत चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करण्याचा निर्णय घेतला.

सोशल मिडियावर व्हायरल झाले महिलेचे ट्विट

तिचे ट्विट अल्पावधीत व्हायरल झाले. लोक तिच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी कमेंट केल्या. रॅपिडो चालकावर कडक कारवाई करण्याची मागणीही काहींनी केली.
३० लाखांचं पॅकेज सोडून ‘हे’ जोडपं विकतंय समोसे, रोजची कमाई ऐकून व्हाल थक्क!

“हे सर्व अॅप्स, मग ते Amazon असो किंवा Flipkart, Ola किंवा Uber, जे अनोळखी व्यक्तींना तुमचे लोकेशन कळवतात, अनेकांसाठी समस्या असू शकते,” असे एका वापरकर्त्याने लिहिले.

“हे खूप वाईट आहे पण सर्वात वाईट गोष्ट म्हणजे हे आश्चर्यकारक आहे की, ज्या प्रकारे आम्हाला दररोज या गोष्टीचा सामना करावा लागतो त्यामुळे मला खूप राग येतो,” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले.

पायलट्सनी चक्क विमानात साजरी केली होळी; प्रवाशांच्या जीवाशी खेळ, कॉकपीटमधील फोटो Viral होताच कंपनीकडून कारवाई

कंपनीने मागितली महिलेची माफी

ट्विट व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच रॅपिडो केअरने महिलेच्या ट्विटला प्रतिसाद देत माफी मागितली.

“हाय, कॅप्टन (रॅपिडो ड्रायव्हर) वसायिकतेच्या अभावाबद्दल जाणून घेणे आमच्यासाठी अत्यंत निराशाजनक आहे आणि आम्ही त्याबद्दल दिलगीर व्यक्त करत आहोत. या प्रकरणावर निश्चितपणे प्राधान्याने कारवाई केली जाईल. तुम्ही कृपया तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि राइड आयडी DM द्वारे शेअर कराल का? असा प्रतिसाद कंपनीच्या ऑफिशिअल हँडलवरुन देण्यात आला आहे.