भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्यामधील वादाची चर्चा मागील दोन महिन्यांपासून सुरु आहे. या वादामध्ये आता विराट कोहली आणि रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह यांच्या एका जुन्या डेटची जोरदार चर्चा सोशल नेटवर्किंगवर सुरु झाली आहे. मात्र खरोखरच हे दोघे डेटवर गेले होते का?, नक्की या दोघांची ओळख कशी झाली? यावरच टाकलेली नजर…

काही वेबसाईट्सने दिलेल्या वृत्तानुसार सहा वर्षांपूर्वी विराट कोहली आणि रोहितीची रितिका दोघेच एकत्र सिनेमा पाहण्यासाठी (मुव्ही डेटला) गेले होते. विराट आणि रोहितमध्ये कोणताही वाद नसून अशा चर्चांना महत्व दिले जाऊ नये असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले होते. रोहित आणि विराट वादाच्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात असतानाच आता पुन्हा विराट आणि रितिकाच्या या जुन्या मुव्ही डेटच्या चर्चांना उधाण आल्याचे दिसत आहे.

भारतीय संघासंदर्भातील काही निर्णयांवरुन रोहित आणि विराटमध्ये मतभेद असल्याने त्यांच्यात वाद सुरु झाल्याचे बोलले जाते. विश्वचषक २०१९ च्या न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यामध्ये महेंद्रसिंग धोनीला सातव्या क्रमांकावर खेळायला पाठवण्यावरुन दोघांमधील वाद चव्हाट्यावर आल्याचे समजते. भारत विश्वचषक स्पर्धेमधून बाहेर पडल्यानंतर विराट आणि रोहितमधील वादाची सर्वाधिक चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये झाल्याचे पहायला मिळाले.

…आणि विराट-रितिकाच्या डेटचा फोटो छापून आला

२०१३ साली भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर मायदेशी परतल्यानंतर विराट कोहली मुंबईमध्ये एका मुलीबरोबर फिरताना पहायला मिळाला. यशस्वी दौऱ्यानंतर भारतात परतलेल्या संघाचा भाग असणारा विराट बरेच दिवस मुंबईमध्येच होता. यादरम्यान तो एका मुलीबरोबर फिरताना दिसला. भारतीय संघाने विश्वचषक जिंकलेल्या संघात समावेश असलेला आणि त्यानंतर आपल्या तुफान फलंदाजीमुळे लोकप्रिय झालेले विराट त्यावेळी नुकताच प्रकाशझोतात येत होता. त्यामुळेच विराटच्या या भटकंतीवर फोटोग्राफर्सची नजर पडली आणि तो त्याच्या मैत्रिणीबरोबर जाईल तेथे फोटोग्राफर्सची गर्दी होऊ लागली. विराटने कधीच फोटोग्राफर्सला विरोध केला नाही. मात्र विराटबरोबर भटकणारी त्याची मैत्रिण म्हणजे रितिका अनेकदा फोटग्राफर्सला पाहिल्यावर चेहरा लपवताना दिसली. त्यावेळी रितिका स्पोर्ट्स टॅलेंट मॅनेजर म्हणून काम करायची. त्याच काळात विराट आणि रितिका मुव्ही डेटला गेल्याचे फोटो डीएनए या वृत्तपत्राने छापले होते.

अशी झाली भेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रसारमध्यामांमधील वृत्तानुसार विराट कोहली आणि रितिकाची भेट पहिल्यांदा आयपीएलमध्ये २०१० साली झाली होती. रितिकाने २०१० ते २०१३ दरम्यान विराटसाठी स्पोर्ट्स टॅलेंट मॅनेजर म्हणून काम करत होती. त्यानंतर तीने ते काम सोडले. २०१५ साली रितिका आणि रोहित शर्मा विवाहबंधनात अडकले. तर २०१७ साली विराट आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे लग्न झाले.