viral Video: पावसाळा असो उन्हाळा असो किंवा हिवाळा प्रत्येक ऋतूत मुंबईकर आवर्जून एका पेयाचे न विसरता सेवन करतो ते म्हणजे ‘चाय’.. तुम्हाला वाटेल की कडक उन्हात एक कप चहा पिणे वेडेपणा आहे. पण, काही लोकांसाठी ही एक जीवनशैली आहे. प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर चाय स्टॉल लावले जातात, मातीच्या कपांमध्ये किंवा कुल्हडमध्ये चहा ग्राहकांना दिली जाते. तर अलीकडेच, मुंबईतील दोन जपानी मित्रांनी इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. भारतात उन्हाळ्यात प्रत्येक मुंबईकर काय करतो याची एक छोटी झलक दाखवण्यात आली आहे.

क्लिपमध्ये दोन जपानी मित्र अगदीच घामाघूम होऊन उन्हात फिरताना दिसत आहेत. या दोन जपानी मित्रांपैकी एक मित्र एक चाय स्टॉलवर जातो आणि दोन कप चाय ऑर्डर करतो. दुसरा मित्र त्याला आश्चर्याने ‘या उन्हात तू चाय पिणार आहेस का?’ तर चहाची ऑर्डर देणारा दुसरा मित्र चहाचा स्वाद घेत हिंदीमध्ये बोलतो की, “जिंदगी वही जीते है जो गरमी में भी चाय पीते है’ म्हणजेच ‘खरं जीवन तेच जगतात जे उन्हाळ्यात सुद्धा चाय पितात’; असे खरं पण मजेशीर असे उत्तर देतो. जपानी मित्रांना चहाची कशी भुरळ पडली एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…प्रवाशाचा एसी लावण्याचा आग्रह; संतप्त कॅब चालकाने वादच सुरु केला; VIDEO पाहून होईल तुमचाही संताप

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, दोन्ही जपानी मित्र कडकत्या उन्हात फिरताना दिसत आहेत. त्यातील एक मित्र मात्र थंडगार सरबत पिण्याएवजी चहा पिण्यास प्राधान्य देतो. हे पाहून त्याच्याबरोबर असणारा दुसरा मित्र आश्चर्य व्यक्त करतो. पण, ‘खरं जीवन तेच जगतात जे उन्हाळ्यात सुद्धा चाय पितात’ हे सांगत तो मित्रालाही चहाचे सेवन करण्यास सांगतो. हा व्हिडीओ मनोरंजनाच्या दृष्टीने बनवला असला तरीही मुंबईकरांचे चहावर असणारं प्रेम अधोरेखित करत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @koki_shishido आणि @shibagen33 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. मुंबईकर व्हिडीओ पाहून जपानी मित्रांची प्रशंसा करताना व त्याच्या कॉन्टेन्टचं कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. तसेच अनेक चहाप्रेमी त्याचे चहावरील प्रेम इमोजीद्वारे व्यक्त करत आहेत. एकूणच जपानी मित्रांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि अनेक मुंबईकरांचे व खास करून चहा प्रमींचे लक्ष वेधून घेत आहे.