सोशल मीडियावर अनेक मजेशीर फोटो व्हायरल होत असतात. यातील काही फोटो आपणाला आश्चर्यचकीत करणारे असतात तर काही आपले मनोरंजन करणारे असतात. शिवाय व्हायरल होणाऱ्या हजारो फोटोंमध्ये एखादाच फोटो असा असतो जो नेटकऱ्यांना मनापासून आवडो आणि भावतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर काही नेटकरी भावनिक तर काही मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
व्हायरल होत असलेला फोटोत एका तरुणाचे वडील आणि सासरे प्रवासादरम्यान कारच्या मागच्या सीटवर झोपल्याचे दिसत आहेत. या तरुणाने स्वत: आपल्या वडिलांचा आणि सासऱ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करणाऱ्या तरुणाचे नाव मंदार नाटेकर असं आहे. मंदारने हा फोटो त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “दोन्ही वडिलांना रोड ट्रिपवर घेऊन जाणे हे दोन मुलांना एकत्र घेऊन जाण्यापेक्षा कमी नाही. भरपूर झोप, जेव्हा ते जागे होतात तेव्हा त्यांना जेवण, चहा, लू ब्रेक, नंतर डुलकी हवी असते.” पुन्हा याची पुनरावृत्ती. मध्येच जुन्या आठवणींचे किस्से… मजा!”
हेही पाहा- जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांना पाहताच वाघ संतापला अन्…, थरारक Video पाहून अंगावर येईल काटा
हा फोटो शेअर करताच अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांना हा फोटो खूप सुंदर असून तो आपणाला आवडल्याचं म्हटलं आहे तर काहींनी आमच्याकडेही अशीच परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. एका नेटकऱ्यांने फोटोवर कमेंट करताना लिहिलं आहे की, “अरे! त्या दोघांनाही आशीर्वाद आणि तुम्हालाही! इतक्या प्रेमाने आणि आदराने असे फारसे लोक राहत नाहीत.” तर आणखी एकाने सगळे वडील सारखेच असल्याचं म्हटलं आहे. तर एका वापरकर्त्याने तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला असे वडील लाभले आहेत असं लिहिलं आहे. त्यामुळे काहींनी या फोटोवर भावनिक तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळत आहे.