प्रत्येक देशात विवाहाशी संबंधित अनेक नियम आहे. भारतातही अनेक प्रथा आणि परंपरेला घेऊन विवाह सोहळा पार पडत असतो. हुंडा त्यातलाच एक प्रकार. जरी भारतात हुंडाबंदी असली तरी समाजात हुंडाबळीचे अनेक लोक शिकार होतात.
हुंडा घेणे म्हणजे नेमकं काय ?
हुंडा घेणे किंवा देणे हा कायद्याने गुन्हा आहे तरीसुद्धा भारतीय विवाहव्यवस्थेत ही कुप्रथा दिसून येते. लग्न सोहळ्यादरम्यान वधुपक्ष हा वरपक्षाला सोने, पैसे, जमीन किंवा कोणतीही मालमत्ता देतो, म्हणजे त्याला हुंडा देतात.
हुंड्यासंदर्भात कायदेशीर तरतुदी
भारतात अनेक महिला हुंडाबळीची शिकार झाल्या आहेत. हुंड्याच्या लालसेपोटी कित्येक मुली अत्याचाराला सामोरे जातात पण हुंडा घेणे कायद्याने गुन्हा आहे. हुंडाबंदी अधिनियम १९६१ च्या कलम ३, कलम ४, आणि कलम ४ अ अन्वये हुंडाशी निगडित कायदेशीर तरतुदी आहे.
हेही वाचा – तुमचाही फ्रिज वारंवार खराब होतो का? ‘या’ चार गोष्टींची काळजी तुम्ही घ्यायलाच हवी
या ठिकाणी मुलींना दिला जातो हुंडा
सहसा भारतीय विवाह व्यवस्थेत मुलांकडील पक्ष हुंडा घेतात. पण तुम्हाला एका ठिकाणाविषयी माहिती आहे का, जिथे मुलीकडील पक्ष हुंडा घेतात. तुम्ही म्हणाल असं कुठे घडतं?
मीडिया रिपोर्ट्सनुसार चीन या देशातील नानचांग भागात मुलीकडील पक्ष हुंडा घेतात. ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या एका रिपोर्टने एका केस स्टडीमध्ये याचा उल्लेख केला आहे. येथील एका मुलीने लग्नाच्या वेळी हुंडा घेण्यास नकार दिला आणि घरच्यांनाही हुंडा घेण्यास मनाई केली होती. हे प्रकरण बरंच गाजलं होतं, ज्यामुळे या अजब-गजब प्रथेविषयी बऱ्याच लोकांना माहिती मिळाली.
हेही वाचा – ‘या’ गोष्टींची काळजी घ्याल तर तुमचं व्हॉट्सॲप चुकूनही हॅक होणार नाही!
येथील मुली हुंडा का घेतात?
नानचांग भागात ही प्रथा खूप प्रचलित आहे. येथे लग्नाच्या वेळी मुलांना मुलींच्या पक्षांना हुंडा द्यावा लागतो. ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’मध्ये असं करण्यामागील कारणही सांगितलं आहे. येथे लैंगिक समानता नाही. यामुळे हा नियम अनेक वर्षांपासून लागू करण्यात आला आहे आणि लोक या नियमाचे पालन करतात.