परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही किंवा त्यांना अभ्यास करायला वेळ मिळत नाही म्हणून ते चुकीचा मार्ग निवडतात आणि परीक्षेत कॉपी करण्याचे वेगवेगळे उपाय शोधून काढतात. तसेच कॉपी करताना शिक्षकाने पाहिले, तर विद्यार्थ्याकडून पेपर हिसकावून घेण्यात येतो किंवा पुन्हा तसे न करण्याची सूचना दिली जाते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका महिलेला परीक्षेत कॉपी करताना पर्यवेक्षक पकडतात आणि पेपर हिसकावून घेतात. हे पाहताच महिलेचा राग अनावर होतो आणि ती रागात पर्यवेक्षकाला मारहाण करण्यास सुरुवात करते.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ एका परीक्षा हॉलचा आहे. तेथे मोठ्या संख्येने परीक्षार्थी उपस्थित आहेत. परीक्षा चालू असताना एक पर्यवेक्षक एका महिलेला कॉपी करताना पकडतो आणि तिची उत्तरपत्रिका काढून घेतो. हे पाहताच महिलेचा संताप होतो आणि ती परीक्षा हॉलमध्ये सगळ्यांसमोर पर्यवेक्षकाशी जोरजोरात भांडायला सुरुवात करते. हे भांडण करताना महिला स्वतःचे भान विसरते आणि पर्यवेक्षकाचा शर्ट पकडण्यास सुरुवात करते. त्या परीक्षार्थी महिलेने पर्यवेक्षकाबरोबर कशा प्रकारे गैरवर्तणूक केली ते एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा…
व्हिडीओ नक्की बघा :
पर्यवेक्षकाला मारण्यास केली सुरुवात :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, पर्यवेक्षक उत्तरपत्रिका काढून घेतो म्हणून महिलेचा राग अनावर होतो. पर्यवेक्षकाच्या हातात उत्तरपत्रिका असते आणि ती खेचून घेण्याचा महिला प्रयत्न करीत असते. पण, पर्यवेक्षक उत्तरपत्रिका हातातून सोडत नाही हे बघताच महिला भान विसरून पर्यवेक्षकाचा शर्ट खेचत त्याला ढकलून देते आणि मारहाण करते. हे सर्व बघून, परीक्षा हॉलमधील लोक पर्यवेक्षक आणि ती महिला यांच्याभोवती घोळका करून उभे राहतात आणि प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात.
परीक्षेसाठी वर्गात जमलेल्या लोकांमधील एक व्यक्ती “पोलिसांना बोलवा” असे मोठ्याने ओरडतानाही दिसत आहे आणि प्रत्येक जण महिलेला समजावताना दिसून आला आहे. पण, तरीही महिलेचा राग शांत होताना दिसत नाही आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.