Viral video: लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. अशा कार्यक्रमांमध्ये संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. अशाच एका काकूंनी हळदीत खतरनाक डान्स केला आहे.
सोशल मीडियावर विचित्र व्हिडीओची कमी नाही. लोक वेगवेगळे व्हिडीओ इथे शेअर करत असतात. जे डान्स किंवा एखाद्या टॅलेंटशी संबंधीत असतात. शिवाय माहिती देणारे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही घायाळ व्हाल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हळदीच्या कार्यक्रमात या काकूंनी काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोल्ली अहो भेटाना नदीच्या काठीशी..या मराठी गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. डोळ्यावर गॉगल लावून या काकी एकापेक्षा एक भारी एक्स्प्रेशन देत आहेत. या व्हिडिओमधल्या काकूंच्या डान्स स्टेप्स आणि एक्स्प्रेशन्स पाहिल्यानंतर ते अनेकांना पसंत पडत आहे. महिलेच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हालाही खूप आवडतील. ही महिला इतकी सुंदर नाचतेय, की त्यावरून तुमची नजर हटणार नाही. तिचा डान्स नेटकऱ्यांना खूप आवडलाय. काकूंची ही अदा पाहून सर्वच फिदा झाले आहेत.
पाहा व्हिडीओ
आजकाल घरात लग्नाचं वातावरण असेल आणि दादा-वहिनीचा डान्स होणार नाही, असं सहसा होत नाही. अनेक वेळा घरातली सून, सगळ्यांची आवडती वहिनी जेव्हा डान्स फ्लोअरवर उतरून कमरेला साडीचा पदर बांधून नाचते, तेव्हा तिचं टॅलेंट पाहून अनेकांना तिचं कौतुक वाटतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेले विविध प्रकारचे डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये केवळ मुलंच नाही, तर विवाहित महिलाही स्वतःचं कौशल्य दाखवतात.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ maharashtra_soundline_official नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.