kitchen trick: सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी एखाद्या भन्नाट जुगाडामुळे लोक हसत-हसत वेडे होतात, तर कधी एखादी साधी गोष्टही इंटरनेटवर जोरदार चर्चेचा विषय बनते. अशाच एका भन्नाट जुगाडाचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान गाजत आहे. भांडी घासण्यापासून वाचण्यासाठी महिला कोणते उपाय वापरतात हे ऐकून नेहमीच गंमत वाटते.
पण, या व्हिडीओतल्या महिलेचा जुगाड पाहून लोक खरंच थक्क झाले. हा व्हिडीओ पाहताच लोक म्हणाले, “वाह दीदी वाह!” आणि लगेचच प्रतिक्रियांचा पाऊस सुरू झाला, कौतुकही झालं. हा व्हिडीओ ‘भांडी न घासता घरकाम कसे करावे’ या वेड्या कल्पनेवर आधारित आहे. काही लोक घरकामातील वेळ आणि त्रास कमी करण्यासाठी विविध शॉर्टकट वापरतात, परंतु या महिलेची युक्ती कोणाच्याही कल्पनेपलीकडे आहे.
भांडी घासण्याचा त्रास टाळण्यासाठी तिच्या हुशार कल्पनेने सोशल मीडियावरील प्रेक्षक थक्क झाले. व्हिडीओमध्ये एक महिला तिची संपूर्ण प्लेट प्लास्टिकच्या पिशवीने गुंडाळताना दिसत आहे. इतकेच नाही तर तिने प्लेट, वाटी, चमचा आणि अगदी पाण्याचा ग्लासदेखील प्लास्टिकने झाकला आहे. ती त्यावर सुरक्षितपणे जेवते. जेवल्यानंतर, ती फक्त प्लास्टिकची पिशवी काढून टाकते आणि त्याखालील भांडी अगदी नवीन, स्वच्छ आणि चमकदार दिसतात. याचा अर्थ असा की, साबणाची गरज नाही, घासण्याची गरज नाही, वेळ नाही आणि प्रयत्नही नाहीत!
हा देसी जुगाड पाहून सगळ्यांना हसूही येतं आणि आश्चर्यही वाटतं. महिला सहजपणे जेवते आणि नंतर फक्त पॉलिथिन काढते, त्यामुळे ती भांडी अगदी स्वच्छ दिसतात, जणू धुतलेली असतील. हे पाहून प्रेक्षक खूश होतात. अनेकांनी मजेत म्हटले आहे की, आता तेही हा ‘शॉर्टकट’ वापरणार, जेणेकरून जेवणानंतर लगेच आराम करता येईल.
पाहा व्हिडिओ
व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून मजेशीर प्रतिक्रिया आल्या आहेत. काही युजर्सनी मजेत लिहिले, “वाह दीदी, जुगाड असेल तर असा! भांडी घासणं आयुष्यातून गायबच!” तर काहींनी विनोद करत म्हटले, “ही तर इंटरनॅशनल लेव्हलची आयडिया आहे, असं डोकं कुठून आणता तुम्ही?” काहींनी या उपायाचे ‘टाइम सेव्हिंग हॅक’ म्हणून कौतुक केले आणि खरंच हे भांडी घासण्याचा त्रास कमी करतं असं सांगितलं.
काहींनी मात्र टोमणा मारत लिहिलं, “इतका पण आळस नको, भांडी तर दोन मिनिटांत धुतली जातात.” याशिवाय अनेक युजर्स या व्हिडीओवर मीम्स बनवत आहेत आणि मजेत म्हणत आहेत की, आता तेही हा उपाय करून पाहणार आहेत. काही जण तर म्हणाले की, यामुळे ‘भांडी घासण्याची लढाई’ कायमची संपेल!
या व्हिडीओनं पुन्हा एकदा सिद्ध केलं की, सोशल मीडियावर जुगाड, क्रिएटिविटी आणि मजेशीर आयडियांची कधीही कमी नाही. एक साधा, निरागस आणि भन्नाट जुगाडही लोकांना किती हसवू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे.
