देशात महिला किती असुरक्षित आहे हे सांगणा-या दुर्देवी घटना रोज घडत असतात. त्यातूनच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. छेडछाडीला विरोध करणा-या एका महिलेला तीन गुंडांनी भर रस्त्यात मारहाण केली. या महिलेच्या आणि तिच्या नव-याच्या डोक्यातून रक्त येईपर्यंत त्यांच्या डोक्यावर बांबूने मारण्यात आले. उत्तर प्रदेशमधील मैनपुरी जिल्ह्यात हा प्रकार घडला.
वाचा : मुलगा गुगलमध्ये इंजिनिअर, तर वडील गावात करतात मोलमजुरी
उत्तर प्रदेशमधील सगळ्यात गजबजलेल्या किशनी गावात एका महिलेची भररस्त्यात छेड काढण्यात आली. ही महिला आपल्या पत्नी आणि मुलीसोबत खरेदीसाठी आली होती तेव्हा एकाने तिची ओढणी खेचण्याचा प्रयत्न केला. या महिलेने छेडछाडीला विरोध केला असता या टोळक्याने महिलेवर हल्ला केला. झी वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार या महिलेने विरोध करतातच तिला मारहाण करण्यात आली. तिच्या डोक्यावर बांबूने मारण्यात आले. तिला आणि तिच्या नव-याला भर चौकात मारण्यात आले. या मारहाणीत दोघांच्याही डोक्याला दुखापत झाली.
वाचा : नोटा भरण्यास उशीर झाला कारण…; योगेंद्र यादव यांचे स्पष्टीकरण सोशल मीडियावर व्हायरल
या मारहाणीनंतर या महिलेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर पोलीस स्टेशनमध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करू अशी धमकीही या महिलेने पोलिसांना दिली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आनंद यादव याला पोलिसांनी अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वी महिला अत्याचारासंदर्भात एक सर्वेक्षण सादर करण्यात आले होते. यात देशातील सर्वाधिक महिला अत्याचारांच्या घटना उत्तर प्रदेशमध्ये घडतात असे म्हटले होते.