जगात असे अनेक लोक आहेत, जे इच्छा नसताना मनाविरुद्ध जॉब करत असतात. त्यांना त्यांचा छंद जोपासायचा असतो, मात्र पैशाच्या गरजेमुळे अनेकदा ते शक्य होत नाही. पण एका महिलेने तिच्या अनोख्या छंदासाठी एक चांगली नोकरी सोडली आहे. तिच्या या निर्णयाचं अनेकजण कौतुक करत आहेत. कारण तिने नोकरी सोडून चक्क जलपरी बनण्याचा निर्णय घेतला आहे.

सोशल मीडियावर ज्या महिलेची चर्चा सुरु आहे तिचं नाव मॉस ग्रीन असं आहे. ३३ वर्षीय मॉस ही एका शाळेत इंग्रजी शिक्षिका होती. पण आता ती जलपरी बनली आहे. शिवाय जलपरी बनण्यासाठी तिने तिची नोकरी सोडली आहे. यूकेच्या मेट्रोशी बोलताना, मॉस ग्रीन म्हणाली की, तिला तिचा छंद जोपासायला खूप आनंद वाटत आहे, शिवाय करिअरचं क्षेत्र बदलल्यामुळे आपण पूर्वीपेक्षा जास्त आनंदी आहे. मॉसने पुढे सांगितलं, “जलपरी बनण्याची कल्पना समुद्रकिनाऱ्यावर सुचली. एकदा समुद्रातून ‘जादुई जलपरी’च्या रूपात आलेल्या एका माणसाला पाहून मी हा निर्णय घेतला. शिवाय हे थोडे वेगळे होते पण मला ते करायचं होतं”

हेही पाहा- Video: केदारनाथ मंदिरासमोरच प्रियकराला केलं प्रपोज; एकमेकांना मिठी मारली अन्…, नेटकऱ्यांनी मोबाईलवर बंदी घालण्याची केली मागणी

अन् छंदच बनला व्यवसाय –

‘रिअल लाइफ जलपरी’ होण्यासाठी पोहताना शेपटी घालावी लागते आणि मॉसला त्याचा पुरेपूर आनंद मिळतो, कारण यामुळे तिला निसर्ग आणि समुद्राचा सहवासात लाभतो. इंस्टाग्रामच्या माध्यमातून या क्षेत्रात नोकरीची ऑफरनंतर अखेर मॉसचा छंदच तिचा व्यवसाय बनला आहे. शिवाय याचे तिला चांगले पैसेदेखील मिळतात. मॉसला व्यावसायिक जलपरी म्हणून प्रशिक्षणही घ्यावे लागले आहे. पाण्यात वेगवेगळे आणि अनोखे पराक्रम करुन दाखवण्यासाठी ती श्वास रोखून पाण्याखाली डुबकी मारायला शिकली आहे. शिवाय, मला जलपरी बनण्याचे स्वातंत्र्य आवडते आणि कदाचित मला हे आयुष्यभर करायचे आहे, असंही तिने सांगितलं आहे.

पैसा नव्हे आवड महत्त्वाची –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मॉस, पूर्वीइतकी कमाई करत नाही, पण तिला त्याचं काही वाटत नाही. ती म्हणते “जगण्यासाठी हे पुरेसे आहे, कारण मी असं काही काम करत आहे, जे मला मनापासून आवडते. आपला भविष्याकाळ काय असू शकतो हे कोणालाच माहिती नाही, सध्या मी जलपरीच्या क्षेत्रात पाऊल टाकलं आहे आणि ती एक कला आहे.”