जर तुम्ही सोशल मीडियाच्या ‘जगात’ सक्रिय असाल, तर तुम्हाला केव्हा, काय पाहायला मिळेल, काहीच सांगता येणार नाही? कधीकधी आपण गोष्टी पाहून हसतो, आणि कधीकधी आपल्याला आश्चर्य वाटते. एवढेच नाही तर असे काही व्हिडिओ आहेत जे थेट लोकांच्या हृदयाला स्पर्श करतात. तर, काही व्हिडिओवर विश्वास ठेवणे कठीण आहे. असाच एक व्हिडीओ आजकाल लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे, ज्यात एका महिलेने चक्क कॉफी यायला उशीर झाला म्हणून मॅकडोनाल्ड्समध्येच इतका गोंधळ घातला आहे की हे पाहून क्षणभरही तुम्ही थक्क व्हाल, लोक म्हटले की, “कोणी आवरा या बयेला.”

अमेरिकेच्या आर्कान्सा येथील मॅकडोनाल्डच्या आउटलेटमध्ये ही घटना घडलीय. लाल रंगाचा टी शर्ट परिधान केलेली महिला बऱ्याच वेळापासून तिच्या ऑर्डरसाठी प्रतिक्षा करत असल्याचं दिसून येतंय. तिने स्वतःसाठी कॉफी ऑर्डर केली होती. बराच वेळ झाला तरी कॉफी येत नसल्यामुळे तिने एक दोनदा विचारणा देखील केली. परंतू तिथल्या स्टाफने आणखी पाच मिनिटे लागतील असं सांगितलं. हे ऐकून ही महिला बरीच वैतागली. रागाच्या भरात या महिलेने टेबलवरील सर्व साहित्य अस्ताव्यस्त करून टाकलं. तिचा हा राग इथेच शांत होत नाही. पुढे जाऊन आणखी दुसरं सामान खाली पाडते. विश्वास बसत नसेल तर आधी हा व्हिडीओ बघा…

मॅकडोनाल्डमध्ये या महिलेने इतका गोंधळ घातला की अखेर तिला आवरण्यासाठी तिथल्या स्टाफचा पोलिसांना बोलवण्याची वेळ आली. तिच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करू अशी जेव्हा तिला धमकी दिली, त्यानंतर तिने आपला राग आवरता घेतला आणि शांत झाली. तिला डायबेटीज असल्याचं सांगत तिच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झाल्याचं तिने सांगितलं. मधुमेहाच्या त्रासामुळे तिला रहावलं नाही म्हणून तिने गोंधळ घातला, असं या महिलेने सांगितलं.

ही सर्व घटना TikToker CJ याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केली आणि या महिलेला शांत करण्यास मदत केली. हा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अगदी वाऱ्यासारखा पसरलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित होत आहेत आणि हसतही आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक खूप मजा घेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर कमेंट्स सेक्शनमध्ये महिलेच्या असभ्य वर्तनाबद्दल आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. काही युजर्स तर वेगवेगळे विनोद करताना दिसून येत आहेत. तर काही युजर्सनी मॅकडोनाल्डच्या अकाउंटला मेन्शन करत या महिलेच्या वर्तवणूकीवर तिथल्या स्टाफने ज्या पद्धतीने परिस्थितीती हाताळली, त्याबद्दल त्यांच्या स्टाफचं कौतुक देखील करण्यात येतंय.

हा व्हिडीओ ५ ऑक्टोंबर रोजी ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत आतापर्यंत १९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय.