मृत्यू अटळ आहे. मृत्यू नेमका कुणाला कधी गाठेल याचा काही नेम नाही. मात्र, एखादा गंभीर आजार झाल्यास आधीच मृत्यूची कल्पना येते. मृत्यू येण्याआधी आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा असते. गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या एका महिलेने मरण्याआधी पतीला आपली शेवटची इच्छा सांगितली. पत्नीची शेवटची इच्छा एकून पतीला जबरदस्त धक्का बसला. पतीने त्यांच्यातील हा संवाद सोशल मीडियावर शेअर करत पत्नीची इच्छा पूर्ण करावी की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी मदत मागितली आहे.

पती गोंधळात

डॉक्टरांनी एका महिलेला सांगितले की ती खूप गंभीर आजाराने ग्रस्त आहे आणि काही महिन्यांची पाहुणी आहे. दरम्यान, आजारी महिलेने आपली ‘शेवटची इच्छा’ पतीला सांगितली. पण त्या महिलेने नवऱ्याला काहीतरी सांगितले, जे ऐकून त्याला धक्काच बसला. आता या व्यक्तीने संपूर्ण घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे, जी वाचून नेटकऱ्यांनाही धक्का बसला आहे. अवघ्या काहीच दिवसात आयुष्यभरासाठी आपल्याला सोडून जाण्याऱ्या पत्नीची शेवटची इच्छा आपण पूर्ण करु शकतो की नाही अशी भिती या पतीला वाटत आहे. पत्नी आपल्याकडे कधी अशा विचित्र प्रकारची इच्छा व्यक्त करेल याची काहीच कल्पना या पतीला नव्हती. पत्नीची इच्छा ऐकून पती धर्मसंकटात सापडला आहे.  

जाणून घेऊया या महिलेने व्यक्त केलेली शेवटची इच्छा काय होती ज्यामुळे तिच्या नवऱ्याला धक्का बसला आहे.

पतीनं सोशल मीडियावर मागितली मदत

पतीने थेट सोशल मीडियावर पत्नीच्या शेवटच्या इच्छेबाबत पोस्ट टाकली. तसेच पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करावी की नाही याविषयी काय निर्णय घ्यावा याबाबत नेटकऱ्यांकडून सल्ला मागितला. माझ्या पत्नीला दुर्धर आजार झाला आहे. ती फार तर फक्त नऊ महिने जगेल असे डॉक्टरांनी सांगितल्याचे पतीने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. 

हेही वाचा खिशात होते फक्त ३० रुपये, आता कोट्यवधींचा मालक! OYO चे संस्थापक अग्रवाल यांनी शेअर केले संघर्षमय दिवसांमधील फोटो

बायकोने मरण्याआधी सांगितली शेवटची इच्छा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पत्नीच्या या शेवटच्या क्षणामध्ये मला सावलीसारखं तिच्यासोबत रहायचे आहे. तिच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या आहेत. मात्र, माझ्या पत्नीने अत्यंत विचित्र इच्छा व्यक्त केली आहे. ज्यामुळे मी खूपचे गोंधळून गेलो आहे. काय करावे मला काहीच सुचेना. पत्नीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडसह एक रात्र घालवण्याची आणि सेक्स करण्याची इच्छा व्यक्त करत यासाठी परवानगी मागितली आहे. पत्नीची ही इच्छा ऐकून मी धर्मसंकटात सापडलो आहे. तिची इच्छा मी पूर्ण करु की नको? मी नेमकं काय करावे? असं म्हणत सोशल मीडिया पोस्टद्वारे पतीने नेटकऱ्यांची मदत मागितली आहे. त्याच्या या पोस्टवर लोकांनी अनेक कमेंट्स करत चित्र विचित्र सल्ले दिले आहेत.