विमानात प्रवाशांना अनेक प्रकारचे पदार्थ सर्व्ह केले जातात, यावेळी अनेक प्रवासी त्यांच्या आवडीनुसार काही गोष्टी ऑर्डर करतात. पण, कोणाला कोणत्या पदार्थांची ॲलर्जी असू शकते सांगता येत नाही. अशाचप्रकारे एका महिलेला शेंगदाण्याची गंभीर ॲलर्जी होती. ज्यामुळे तिने विमानातील शेंगदाण्याची सर्व पॅकेट्स खरेदी केल्याची घटना समोर आली आहे. महिलेने शेंगदाण्याची जवळपास ४८ पॅकेट्स एकाच वेळी खरेदी केली आहेत.
कोणत्याही प्रवाशाने शेंगदाण्याचे पॅकेट उघडून ते फ्लाइटमध्ये खाऊ नये, अशी महिलेची इच्छा होती. त्यामुळे तिने कॅबिन क्रू मेंबर्सला शेंगदाण्याची पॅकेट्स कोणलाही देऊ नका असे सांगितले. पण, हे नियमाविरोधात असल्याचे सांगत तिला नकार देण्यात आला. शेवटी तिने सर्वच पॅकेट्स खरेदी केली.
२७ वर्षीय लिआ विल्यम्स हिने लंडनहून जर्मनीच्या डसेलडॉर्फला बिझनेस ट्रीपसाठी विमानाने प्रवास करत होती, यावेळी फ्लाइटच्या केबिन क्रूला तिने शेंगदाण्याची ॲलर्जी असल्याचे सांगितले. यानंतर केबिन क्रूने तिची अडचण लक्षात घेत इतर प्रवाशांना शेंगदाणे देण्यास नकार दिला, ज्याचा लिआ विल्यम्स हिला खूप आनंद झाला. यानंतर १३ जुलै रोजी तिने युरोविंग्जने जर्मनीच्या डसेलडोर्फहून लंडनच्या हिथ्रो विमानतळावर जाण्यासाठी विमानात बसली, त्यावेळीही लिआने केबिन क्रूला शेंगदाण्याच्या ॲलर्जीबद्दल माहिती देत, कोणत्याही प्रवाश्याला शेंगदाणे देऊ शकत नाही असे जाहीर करण्याची विनंती केली, पण केबिन क्रूने ही विनंती नाकारली.
इनसाइडरच्या वृत्तानुसार, विल्यम्सला एका फ्लाइट अटेंडंटने कळवले की, हे एअरलाइनच्या नियमांच्या विरोधात आहे, त्यामुळे तुमची विनंती आम्ही मान्य करू शकत नाही. याने विल्यम्स संतापली आणि तिने विमानातील शेंगदाण्याची सर्व पॅकेट्स विकत घेतली. ज्याची किंमत प्रति पॅकेट तीन युरो (सुमारे २०० रुपये) होती.
विल्यम्सने इनसाइडरला सांगितले, केबिन क्रू माझी मदत करू शकले नाहीत, पण तरीही मी माझी मागणी पूर्ण करण्यासाठी त्याला सांगत राहिले, यामुळे ते निराश झाले. यानंतर मी विमानातील सर्व शेंगदाण्याची पॅकेट्स विकत घेण्याचा निर्णय घेतला; जेणेकरून कोणत्याही प्रवाश्याला शेंगदाणे सर्व्ह करता येणार नाही. शेंगदाण्याच्या पॅकेट्सची किंमत किती आहे याचीही मी पर्वा केली नाही. केबिन क्रू मेंबर्स माझी मदत करायला तयार नव्हते, म्हणून माझ्याकडे फक्त हाच पर्याय शिल्लक होता.
विल्यम्स यांनी मिररला सांगितले की, “युरोविंग्जने ही परिस्थिती ज्या प्रकारे हाताळली आणि ज्या प्रकारचा अनुभव मला आला, त्याबद्दल त्यांना लाज वाटली पाहिजे.