मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये दररोज मोठी गर्दी पहायाला मिळते. अशा गर्दीत बसण्यासाठी जागा पकडण्यावरुन अनेक महिलांची भांडणे होतात. महिलांच्या ट्रेनमधील हाणामाऱ्या आणि भांडणाचे अनेक व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील. अशात दिल्ली मेट्रोमध्येही आजकाल महिलांच्या भांडणाचे व्हिडीओ समोर येत आहेत. दरम्यान असाच आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबईच्या लोकल ट्रेनची गर्दीच इतकी असते की, भांडणे होणं स्वाभावीकच आहे. मात्र दिल्ली लोकल ट्रेनमध्ये देखील अशी भांडणे होत आहेत. दोन महिलांमधील ही भांडणे आणि त्यांचे संभाषण ऐकून तुम्हाला देखील राग अनावर होईल.

मेट्रोमध्ये महिलांची हाणामारी

या व्हिडिओमध्ये म्ही पाहू शकता की, गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेली एक महिला काळ्या रंगाच्या सूटमधील दुसऱ्या महिलेशी भांडताना दिसत आहे.वादाला सुरुवात होते तेव्हा दोघीही महिला एकमेकींना अपशब्द बोलतात. भांडणाचे नेमके कारण अस्पष्ट आहे. या दोघींच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्यात. अनेकांनी दोन्ही महिलांवर संताप व्यक्त केला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – प्रियकर किंवा संपत्ती? वडिलांनी दिला पर्याय, मुलीनं कोटींचं ऐश्वर्य लाथाडून केलं त्याच्याशी लग्न…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्ली मेट्रो ही त्याच्या मेट्रो सेवेमुळे नव्हे तर त्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे सर्वाधिक चर्चेत असते. कारण, या मध्ये प्रवास करणारे वेगवगळे प्रवासी कधी कसे वर्तवणूक करतील, सांगता येत नाही. थोडक्यात काय तर, दिल्ली मेट्रो नियमांचे उल्लंघन करण्यासाठी हॉटस्पॉट बनली आहे. दिल्ली मेट्रोमधील असाच आणखी एक व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे