Viral Video :- एखादा व्यवसाय चालू करायचा असेल किंवा एखादे दुकान तुम्हाला उघडायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा त्याची जाहिरात करावी लागते आणि लोकांपर्यंत व्यवसायाची माहिती पोहचवावी लागते. जाहिरातीसाठी कागदाचे पॅम्प्लेट तयार करणे, भिंतीवर पोस्टर चिपकवणे किंवा सोशल मीडिया ॲपवर एखादे अकाउंट तयार करून जाहिरात करणे; अशा विविध पद्धतीने जाहिरात केली जाते. तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं पहायला मिळालं आहे. पिझ्झाचे नवीन दुकान चालू केलेला व्यापारी जाहिरातीसाठी एक भन्नाट युक्ती वापरताना दिसून आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, रस्त्यावर एक पाकीट पडलेलं तुम्हाला दिसेल. रस्त्यावर पडलेलं पाकीट बघून एक महिला ते उचलण्यासाठी तिकडे जाते. महिलेने पाकीट उचलल्यानंतर ती ते उघडून बघते, त्यात €100 रुपयाची नोट तिला दिसते. पण, जेव्हा ती नोट पाकिटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, तेव्हा एक मोठं पॅम्प्लेट उघडताना तुम्हाला दिसेल. खरं तर महिला ज्याला पाकीट समजत असते ते पाकीट नसून ती एक पिझ्झाच्या दुकानाची जाहिरात असते; ज्यावर या नोटेचे चित्र असते. पाकीट उघडताच महिलेला समजते की, तिची फजिती झाली आहे आणि पिझ्झाच्या नवीन दुकानाचा प्रचार करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. €100 एवढ्या मोठ्या युरो नोटेच्या चित्राचे पॅम्प्लेट फोल्ड करून नोटांनी भरलेल्या पाकिटासारखे दिसण्यासाठी ते डिझाईन केले होते. जेणेकरून पाकीट समजून रस्त्यावरून चालत जाणारे त्याला उचलतील आणि पिझ्झाची जाहिरात पाहतील. ज्यावर पिझ्झाच्या दुकानाचा मेनू लिहिलेला तुम्हाला दिसून येईल. हा मजेशीर क्षण महिलेने सोशल मीडियावर शेअर केला आहे. एकदा बघाच ही अनोखी जाहिरात…
हेही वाचा :- कुत्र्याला दूध पाजण्यासाठी चिमुकल्याची धडपड; नेटकरी म्हणाले, “यालाच म्हणतात संस्कार”
व्हिडीओ नक्की बघा :-
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @TheFigen या महिलेच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘खूप चांगली जाहिरात’ असे या व्हिडीओला कॅप्शनदेखील देण्यात आले आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक प्रेक्षक खूप मस्त जाहिरात, उत्तम मार्केटिंग; तर अनेकजण या कल्पनेला पाच स्टार देताना व्हिडीओच्या कमेंटमध्ये दिसून येत आहेत.
