सोशल मीडियावर अनेकदा भांडणाचे व्हिडिओ व्हायरल होतात ज्यामध्ये कॅब किंवा रिक्षा चालकांबरोबर प्रवाशांचे वादाचे व्हिडिओ देखील असतात. सध्या दिल्लीतील एका उबर कॅब चालकाने रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हायरल होत आहे. १ मे २०२५ रोजी उबर कॅब चालक आणि तीन महिला प्रवाशांमध्ये झालेल्या हा वादाचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला. व्हिडीओमध्ये उबर कॅब चालक प्रवास भाडे देण्यास तीन महिला प्रवासी नकार देत आहेत.
व्हिडिओनुसार, महिलांनी डगंज ते मारुती विहार पर्यंत बुक केली होती. महिलांनी ड्रायव्हरला मारुती विहारपर्यंत पोहोचण्यापूर्वी कॅब थांबवण्यास सांगितले. ड्रायव्हरने प्रवास केलेल्या अंतराचे पैसे मागितले तेव्हा त्यांच्यात जोरदार भांडण झाले. ड्रायव्हर पैसे मिळावेत यासाठी आग्रह धरत असताना, त्यापैकी एक महिला “राईड रद्द कर आणि निघ” असे म्हणत असल्याचे ऐकू येते.
व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या ड्रायव्हरला असेही म्हणताना ऐकू येते की,”तो त्यांना जिथे हवे तिथे सोडण्यास तयार आहे. तथापि, महिलांनी ड्रायव्हरवर अनादरपूर्ण बोलण्याचा आरोप केला आणि दावा केला की, तो त्यांना “तू” असे संबोधत होता, जे बहुतेकदा अनौपचारिक मानले जाते. ड्रायव्हरने हा आरोप फेटाळून लावला.”
महिला थेट ड्रायव्हरला नाही तर फक्त अॅपद्वारे भाडे देतील असा आग्रह धरतात त्यामुळे वाद अधिकच तीव्र होतो. प्रत्युत्तरात, ड्रायव्हरला असे म्हणताना ऐकू येते की, मला सीएनजीचे पैसे अॅप देणार आहे का?. चालकाच्या वक्तव्यावरून जर राईड रद्द झाली तर होणाऱ्या नुकसानाबद्दल निराशा व्यक्त करत असल्याचे समजते.
त्यानंतर या व्हिडिओवर एक्सवर व्यापक चर्चा सुरू झाली आहे, वापरकर्त्यांमध्ये या घटनेबद्दल मतभेद आहेत. अनेकांनी प्रवाशांच्या वागण्यावर, विशेषतः प्रदान केलेल्या सेवांसाठी पैसे देण्यास नकार दिल्याबद्दल टीका केली.
एका चालकाने कमेंट केली , “हे प्रवासी नाही हे फुकटे आहेत”
दुसऱ्या चालकाने कमेंट केली की,, “गरीब कष्टकरी लोकांचे शोषण
तिसऱ्या व्यक्तीने कमेंट केली की, “लवकरच तुम्हाला उबर आणि ओलामधून रोख पेमेंट पर्याय निघून जाताना दिसेल. तो फक्त भारतात आहे आणि त्याचा कसा गैरवापर होतो ते पहा.”
व्हिडीओमधील महिलांची ओळख अद्याप अज्ञात असली तरी, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ट्रिपशी संबंधित उबरकडून अद्याप कोणतेही विधान आलेले नाही.