ट्रेनमधून प्रवास करताना प्रत्येकाला शांतता हवी असते. दिवसभर कामा-धंद्याच्या गडबडीने वैतागलेले लोक ट्रेनमधून शांत बसून आराम प्रवास करेन असा विचार करतात. पण काही वेळी इतर प्रवाशांच्या मोठ्या आवाजाचा मनस्ताप सहन करावा लागतो. सध्या वंदे भारत ट्रेनमधील तरुणींचा असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्या अगदी तालासुरात मोठ-मोठ्याने गाणं गाताना दिसतायत. दक्षिण रेल्वेने आपल्या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट केलाय. मात्र सोशल मीडिया युजर्सना या तरुणींचे वागणं अजिबात आवडलेलं नाही. अनेकांनी रेल्वेत हे प्रकार करणं थांबवा असे आवाहन केलेय. तर काहींनी रेल्वे प्रशासनालाच खडे बोल सुनावलेत.

दक्षिण रेल्वेने शेअर केलेल्या व्हिडीओ तुम्ही पाहू शकता, १२ तरुणी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये बसून चेन्नई ते म्हैसूर प्रवास करत असतात. यावेळी आनंदाने त्या तेलुगू भाषेत गाणं गाताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रेल्वेने लिहिले की, चेन्नई ते म्हैसूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आनंदाची लाट! तुम्हीही या मनमोहक क्षणांचे साक्षीदार व्हा. या तरुणींनी त्यांच्या सुरेल गाण्यांनी प्रवास आनंदमय संगीतमय वातावरणात बदलला. मात्र हा व्हिडीओ बहुतांश लोकांना आवडला नाही. अनेकांनी हा प्रकार म्हणजे त्रासदायक असल्याचे म्हटले आहे.

drugged woman high voltage drama caught on camera strips naked demands sex at jamaica airport video viral
नग्नावस्थेत महिलेचा विमानतळावर धिंगाणा! नशेत तिच्याकडून शरीरसंबंधाची मागणी; VIDEO व्हायरल
seema haider with swollen eye lip injury goes viral amid reports of fight with husband sachin deepfake ai video viral
VIDEO : डोळा काळानिळा, ओठाला जखम; सीमा हैदरला पती सचिनने केली बेदम मारहाण? वकिलाने सांगितली खरी वस्तुस्थिती
Actor Daniel Balaji passes away
प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत
Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…

संबंधित तरुणी सामाजिक शिष्टाचार न पाळता इतर प्रवासांना त्रात देत आहेत, अशी टीका लोकांनी केली आहे. तर काहींनी रेल्वे अशा गोष्टींना प्रोत्साहन का देतेय असा सवाल उपस्थित केला आहे.

एका युजरने लिहिले की, सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या प्रवाशांना गप्प करण्यासाठी मला अतिरिक्त पैसे द्यावे लागतील का? रेल्वे अशा वर्तनाला प्रोत्साहन का देत आहे? जर एखाद्या प्रवाशाला या आधुनिक सायलेंट ऑपरेशन ट्रेनमध्ये झोपायचे असेल तर काय करायचे? आणखी एका युजरने लिहिले की, हा खरचं खूप चिड आणणारा प्रकार आहे. त्या हेडफोन्स घालून गाणी ऐकू शकतात. ट्रेनमधून उतरल्यानंतर ग्रुप अॅटिव्हिटी करु शकतात. अशा प्रकारच्या गोष्टींना प्रोत्साहन देऊ नका.