कोलंबियातील कॅली येथे वर्ल्ड ज्युनियर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप (World Athletics U20 Championships) नुकतीच पार पडली. या ४०० मीटर स्पर्धेतील एक स्पर्धक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. गंमत अशी की काही सेकंदाच्या फरकाने तो स्पर्धा हरला असूनही विजेत्यापेक्षा त्याचेच नाव सर्वांना ठाऊक पडले आहे. इटलीचा १८ वर्षीय धावपटू अल्बर्टो नोनिनो (Alberto Nonino) याच्या बाबत स्पर्धेदरम्यान एक विचित्र किस्सा घडला, ज्याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपण अनेकदा सेलिब्रिटींचे वार्डरोब मालफंक्शन झाल्याचे प्रसंग पाहिले असतील असाच काहीसा अल्बर्टो सोबत घडला आणि त्याची अशी काही अवस्था झाली की चक्क तो स्पर्धेत शेवटी आला. हा नेमका प्रकार काय आहे सविस्तर पाहुयात..

डिकॅथलॉन ह्या १० क्रीडाप्रकांराच्या मिळून असलेल्या स्पर्धाप्रकारातील ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत अल्बर्टो नोनिनो (Alberto Nonino) या खेळाडूने मधल्या लेन मध्ये धावताना कमाल सुरुवात केली होती पण अचानक तो आपले प्रायव्हेट पार्टस झाकताना दिसू लागला. अंडरवेअर घालायला विसरल्याने त्याच्या शॉर्टस च्या एका बाजूने प्रायव्हेट पार्ट बाहेर येत असल्याने त्याची आणखीनच पंचाईत होऊ लागली, परिणामी त्याचा वेगही मंदावला आणि गोल्ड मेडलच्या शर्यतीत ५१.५७ सेकंदाच्या वेळेसह तो सर्वात शेवटी अंतिम रेषेच्या पार आला. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकता की अल्बर्टोने घातलेल्या शॉर्ट्स सैल असल्याने हा एकूण प्रसंग उद्भवला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

पहा Alberto Nonino चा Viral Video

दरम्यान, या घटनेबाबत स्वतः अल्बर्टोने सुद्धा इंस्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली. तसेच ” जे झालं ते मला माहित आहे, मी या प्रसंगाला विनोदी किस्सा समजून जाण्याचा प्रयत्न करत आहे पण मला थोडा वेळ द्या” अशा शब्दात त्याने फॅन्सला विनंती केली आहे.

Karate Dog: कुत्र्याने घातला राडा.. मांजरीला शिकवला धडा, पहा मजेशीर Viral Video

Alberto Nonino इंस्टाग्राम पोस्ट

दरम्यान यापूर्वी अनेक महिला खेळाडूंच्या बाबतही कपड्यांमुळे अनेकदा फजिती झाल्याचे प्रसंग घडले आहेत. पण या एका चुकीमुळे होणाऱ्या चर्चेपेक्षा सुवर्ण पदक गमावल्याचे दुःख अल्बर्टोला अधिक असल्याचे त्याने इंस्टाग्रामवरील पोस्ट मध्ये नमूद केले आहे.

Story img Loader