world’s biggest lips girl : सुंदर दिसायला कुणाला आवडत नाही. यासाठी आता मेकअपपासून ते कॉस्मेटिक सर्जरीपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे डोक्यावरच्या केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत सुंदर दिसण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात. पण इतरांपेक्षा सुंदर आणि हटके दिसण्याच्या नादात केलेली सर्जरी अनेकांच्या अंगलट आल्याची उदाहरणे आपण वाचली असाल. सुंदर दिसण्याची अशीत एक हौस एका तरुणीला चांगलीच भारी पडली आहे. या हौसेपायी केलेल्या सर्जरीने तरुणीचे ओठ हे जगातील सर्वात मोठे ओठ बनले आहेत. पण यामुळे तरुणीला तिच्यावर प्रेम करणारा जोडीदार सापडणे अवघड झाले आहे. फिलर्सनंतर फुग्यांसारखे ओठ झालेली ही तरुणी आजही तिच्या आयुष्यात वेदना सहन करत आहे.

एंड्रिया एमिलोवा इवानोवा असे या तरुणीचे नाव असून ती अवघ्या २५ वर्षांची आहे. एंड्रियाने एवढ्या लहान वयात ओठ हायलाइट करण्यासाठी इतके फिलर्स लावले आहेत ज्यामुळे तिचे ओठ आता फुग्यासारखे दिसत आहेत. या ओठांची तिला काही अडचण नाही पण एवढं करुनही तिला मनासारखा प्रेम करणारा जोडीदार सापडत नाही याचं तिला दु:ख आहे.

आश्चर्याची गोष्टी म्हणजे, एंड्रियाने सुंदर दिसण्यासाठी ८, १० नाही तर तब्बल ४३ ब्युटी प्रोसिजक केल्या आहेत, ज्यासाठी तिने जवळपास २० लाख रुपयांहून अधिक खर्च केला आहे. एंड्रियाचे जगातील सर्वात मोठे ओठ असणारी तरुणी आहे, तरीही तिला आणखी मोठे ओठ करण्याची इच्छा आहे. आता ती गालीची हाडे टोन करण्यासाठी ४ हायलुरोनिक ऍसिड इंजेक्शन्स देखील घेणार आहे. मात्र आत्तापर्यंत झालेल्या सर्जरीनंतर तिचा चेहरा पूर्णपणे बिघडून गेला आहे. मात्र सोशल मीडियावर तिने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.असे असतानाही तिला प्रेमाच्या बाबतीत अद्याप यश मिळत नाही.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, एंड्रिया म्हटले की, अनेक पुरुषांना तिचे दिसणे थोडे विचित्र वाटते, पण अनेकांना हे आवडते. तिला ऑनलाईन डेटिंग, पैसे आणि ट्रीपच्या ऑफर्स येतात पण आता ती प्रेमाची वाट पाहतेय. अशा परिस्थितीत ती आता एका रिअॅलिटी शोच्या माध्यमातून तिचे प्रेम शोधणार आहे. तिच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी अनेकदा तिला प्रेमात धोका मिळाला आहे, परंतु आता तिच्याकडे लग्नाचे प्रस्ताव येत आहेत. तरीही तिला आधी प्रेम मिळवायचे आहे, ज्यात तिला असा जोडीदार हवा आहे जो तिला तिच्या कृत्रिम सौंदर्यासह स्वीकारेल.