Viral Video :- मित्र-मैत्रिणीसोबत किंवा कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाताना तुम्ही अनेकदा रस्त्याच्या कडेला नाश्ता-पाण्यासाठी हॉटेलवर थांबता. हॉटेलमध्ये प्रवासादरम्यान ताजेतवानं होण्यासाठी काही सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय केलेली तुम्हाला दिसून येते. प्रवाशांना स्वच्छतागृह वापरताना चांगल्या सुविधा आणि चांगले वातावरण मिळावे यासाठी तेथे चित्रं रेखाटलेली, झाडं लावलेली, तर जुन्या काळातील विशिष्ट रचनेनं सजवलेली स्वच्छतागृहं तुम्ही आजवर पाहिली असतील. पण, तुम्ही कधी सोन्यानं सजलेलं सार्वजनिक स्वच्छतागृह पाहिलं आहे का ? तर आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. त्यात तुम्ही राजेशाही रचनेनं तयार झालेलं सार्वजनिक स्वछतागृह पाहू शकता.
सोशल मीडियावरील हा व्हिडीओ क्रुशांगी या युजरने शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, सोनेरी रंगानं सजलेला एक राजवाडा तुम्हाला दिसेल. पण, हा राजवाडा किंवा बंगला नसून, ते थायलंडमधील एक सार्वजनिक स्वच्छतागृह (Public Toilet) आहे. या सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या आत जाताच सगळ्यात आधी महिला आणि पुरुष यांचे चित्र काढलेला बोर्ड तुम्हाला दिसेल. त्यानंतर महिलांच्या बाथरूममध्ये जाण्यासाठी त्या मार्गावर बाहेर एका सोनेरी खांबावर ‘महिला’ असं लिहिलेलं तुम्हाला दिसेल. विविध नक्षीकाम करण्यात आलेल्या या स्वच्छतागृहात अनेक बेसिन आणि मोठमोठे आरसे व पांढऱ्या रंगाचे पडदे लावलेले तुम्हाला दिसतील. समोर एक मोठे उद्यान आहे की, जे या सोनेरी स्वच्छतागृहाची शोभा वाढवताना दिसत आहे. भव्य राजवाडा, अदभुत कल्पना, राजेशाही थाट आणि सोनेरी रंग यांनी सजलेल्या या सार्वजनिक स्वच्छतागृहाची गोष्टच निराळी आहे. अगदी राजवाड्यासारखं दिसणारं हे सार्वजनिक स्वच्छतागृह तुम्ही आजवर कधी पाहिलं नसेल. राजवाड्यासारखी रचना केलेलं हे स्वच्छतागृह पाहून तुम्हीसुद्धा मोहात पडाल. एकदा बघाच हे अनोखं सार्वजनिक स्वच्छतागृह.
व्हिडीओ नक्की बघा :-
हा व्हिडीओ @Krishangiisaikia या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत सुरुवातीला एक तरुणी म्हणताना दिसत आहे की, मी कधी विचारसुद्धा केला नव्हता की, मी कधी स्वच्छतागृहाचासुद्धा व्हिडीओ शूट करीन; पण या स्वच्छतागृहाला बघून आज मी स्वतःला थांबवू शकले नाही. आणि हा व्हिडीओ तिनं शूट करून, तिच्या अकाउंटवर पोस्ट केला आहे; जो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहाची अशी राजेशाही रचना पाहून अनेक जण चकित होत आहेत आणि कमेंटमध्ये प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून येत आहेत. एक युजर म्हणत आहे की, मी या ठिकाणी जाऊन, छान कपडे घालून खूप फोटो काढेन. तर, अनेक जण या सार्वजनिक स्वच्छतागृहाला ‘शाही शौचालय’ म्हणत आहेत. तर, अनेक जण सार्वजानिक स्वच्छतागृहाच्या सुंदर रचनेचं कौतुक करताना दिसून येत आहेत.