पोटाची खळगी भरण्यासाठी नोकरी करणे हे क्रमप्राप्तच आहे. आपण करत असलेली नोकरी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असणेही आवश्यक आहे. मात्र जगात अशाही काही नोकऱ्या आहेत ज्यामुळे आपल्या जीवाला धोका उद्भवू शकतो. आता अशा कोणत्या नोकऱ्या आहेत ज्या आपल्या जीवावर बेतू शकतात. आपण नोकरी करत असताना अगदी लहान लहान गोष्टीवरुन नाराज होतो. मात्र या नोकऱ्या पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की आपण किती लहान गोष्टींवरुन त्रागा करत असतो. ज्यांना जीवावर बेतणारे काम करावे लागते त्या लोकांचे काय होत असेल. तेव्हा तुम्ही लहानसहान गोष्टींवरुन त्रागा करत असाल तर या नोकऱ्यांच्या बाबतीत जाणून घ्यायलाच हवे.

१. सापाचे विष काढणे – ही जगातील सर्वात कठिण मानली जाणारी नोकरी आहे. सापाचे विष काढणे हे कठिण काम असून ते करताना तुमचा प्राणही जाऊ शकतो. या लोकांना नोकरीमध्ये सुरक्षा कवच देण्यात येते. आतापर्यंत हे काम करताना विषारी साप चावल्याने मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

२. सल्फरच्या खाणीत काम करणे – सल्फरच्या खाणीत काम करणे ही इंडोनेशियामधील एक महत्त्वाची नोकरी मानली जाते. याठिकाणी काम करणाऱ्या लोकांची फुफ्फुसे खराब होतात. तसेच त्यांच्या डोळ्यांचीही मोठ्या प्रमाणात आग होते. हे इतक्या जास्त प्रमाणात होते की अनेकदा हे काम सतत केल्याने त्यांचा गळा आणि छातीत जखमा होतात.

३. स्टंटमन – आपण चित्रपटात अनेकदा वेगवेगळे स्टंटस पाहतो. हे स्टंटस पहायला आपल्याला बरीच मजाही येते. पण हे स्टंट करणारे व्यक्ती कायमच खूप धोक्याच्या परिस्थितीत काम करत असतात. स्टंट करणे हे वाटते तितके सोपे काम नसून अनेकदा यामध्ये काही जणांचे प्राणही गेले आहे.

४. अंडरवॉटर वेल्डींग – पाण्याच्या खाली असलेल्या गोष्टींचे वेल्डींग करण्याचे काम यामध्ये येते. पाण्याच्या आत हे काम करताना स्फोट होण्याची शक्यता जास्त असते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे काम म्हणजे पोलिस ऑफीसरच्या नोकरीच्या १००० पट जास्त धोकादायक असते.

५. वायरमन – वायरमनचे काम सगळ्याच देशात करावे लागते. सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या वीजेच्या खांबांची दुरुस्ती करणे हे धोक्याचे काम असते. याठिकाणी वीजेच्या हायटेन्शन लाईन असतात. त्यामुळे वीजेचा धक्का बसण्याची शक्यता असते. या कामाची कोणतीही नेमकी वेळ नसते. त्यामुळे कधीही उठून हे काम करायला जावे लागते.

६. फायरमन – कोणत्याही ठिकाणी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम हे लोक करत असतात. यावेळी आगीत अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी या लोकांना जीवाची बाजी लावावी लागते. मात्र यामध्ये त्यांच्या जीवाला धोका असतो. आग विझवण्याचे काम करत असताना फायरमनचाच मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.

७. कोळसा खाणी – कोळशाच्या खाणीत काम करणेही जीवावर बेतणारे ठरु शकते.