Viral Video : या आजोबांची एनर्जी बघून तुम्हालाही व्हाल थक्क; नेटकरी म्हणतायत ही तर बूस्टर डोसची कमाल

सोशल मीडियावर या आजोबांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून फेसबुक, इंस्टाग्रामवर लोकं मोठ्या प्रमाणावर हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

viral video
नेटकरी या व्हिडीओवर अतरंगी कंमेंट्सही देत आहेत. (Photo : memewalanews / Instagram)

असं म्हणतात, म्हातारपणात वयस्कर व्यक्ती अगदी जपून वागतात. ते आपली कामे अतिशय आरामात करतात. कारण वयस्कर व्यक्तींकडे आधीसारखी ताकद नसते. तथापि, काही लोक ही गोष्ट नाकारतात. त्यांना आपलं आयुष्य खुलून जगायला आवडतं. अशाच एका आजोबांचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओ मध्ये एक आजोबा मैदानात क्रिकेट खेळताना दिसत आहेत. त्यांच्या हातात बॅट असून ते अगदी एखाद्या लहान मुलाप्रमाणे खेळत आहेत.

या आजोबांची एनर्जी बघून लोकं झाली हैराण

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की हे आजोबा एका मैदानात अगदी उत्साहात क्रिकेट खेळत आहेत. आजोबा आपल्या हातात बॅट पकडून बॉल यायची वाट बघत आहेत. जसा बॉल फेकला जातो, हे आजोबा त्या बॉलला जोरदार शॉट मारून एखाद्या लहान मुलासारखे रन्स घ्यायला धावतात. त्यांना बघून आजूबाजूला उभे असलेले लोक हसू लागतात. इतकंच नाही तर हे आजोबा आनंदात उड्या मारतात आणि इकडे तिकडे पळू लागतात.

बायकोसाठी काही पण ! पत्नीच्या इच्छेखातर पतीने घरीच बनवलं विमान; फोटो व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ

सोशल मीडियावर या आजोबांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून फेसबुक, इंस्टाग्रामवर लोकं मोठ्या प्रमाणावर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. अनेक लोक या आजोबांची मस्करी देखील करत आहेत. या व्हिडीओला अनेकांनी लाईक केलं आहे. तसेच नेटकरी या व्हिडीओवर अतरंगी कंमेंट्सही देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: You too will be amazed by seeing old man energy viral video pvp

Next Story
स्वत:ला आरशात पाहून घाबरून पळून गेला कुत्रा, मजेशीर video viral
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी