भारतात कलेला अत्यंत महत्त्व आहे. अनेक कौशल्यवान कलाकार भारतात आहे पण काही मोजकेच कलाकार असतात ज्यांना संधी मिळते आणि ते संधीचे सोने करतात. पण असेही अनेक कलाकार आहे ज्यांना योग्य संधी मिळत नाही आणि ते आयुष्यात मागे राहतात. अनेक कलाकार अंत्यंत संघर्षमय जीवन जगतात आणि आपली कला जोपसतात. व्हिडीओ पाहून लक्षात येते की, व्यक्तीच्या अंगी कला असेल तर ती नेहमी त्याच्याबरोबर राहाते मग भलेही तर रस्त्यावर का असेना. व्यक्तीची कलाच त्याची ओळख ठरते. अशाच एका कलाकाराचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे जो पोहून लोक थक्क होत आहे.
कलेला तोड नाही! रस्त्यावरील कलाकाराचा व्हिडीओ व्हायरल
इंस्टाग्रामवर vipinkrishna_77_aqua नावाच्या अकाउंटवर पोस्ट केलेला व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमधील व्यक्ती रस्त्यावर राहत असल्याचे दिसत आहे. उंच कट्टा असलेल्या फुटपाथ जवळ व्यक्ती बसला आहे आणि जवळच एका कापड दिसत आहे ज्यावर काही पैसे असल्याचे दिसत आहे. या व्यक्तीने फुटपाथवर अत्यंत सुंदर चित्र रेखाटले आहे. निळे आकाश, पांढरे ढग, नाराळाचे झाड, हिरवळ असे निसर्गरम्य चित्र त्याने काढले आहे. त्याच्या जवळ काही रंगही ठेवलेले दिसत आहे. चित्र काढून हा व्यक्ती चार पैसे मिळावे अशी अपेक्षा करत आहे. व्हिडीओ पाहून लोक त्याच्या कलेचे कौतूक करत आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”संधी शिवाय कौशल्याची काहीच किंमत नाही.”
नेटकऱ्यांनी केले कलाकराचे कौतूक
व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले की,”जर त्याला चित्रकलेचे शिक्षक म्हणून एखाद्या शाळेने काम दिले तर तो नक्कीच उत्तम चित्रकार घडवू शकतो. त्याला आयुष्यात समाधान मिळेल.” दुसऱ्याने लिहले की, “रस्त्यावरील प्रतिभावान कलाकार” तिसरा म्हणाला, “इतके प्रतिभावान कलाकार रस्त्यावर का असतात? आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ते संधीचे सोने करू शकतात.” चौथ्याने लिहिले की, “अशा कलाकांरासाठी काहीतरी केले पाहिजे”