Viral Video: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. अनेकदा त्यावर अपघाताचेही अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. जे समोर येताच काही क्षणांत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळवतात. बऱ्याचदा अपघात हे स्टंट करण्यामुळे होतात. त्यावर नेटकरी तीव्र संतापदेखील व्यक्त करताना दिसतात. अशा विविध प्रकारच्या स्टंटमुळे अनेकांनी आजपर्यंत आपला जीव गमावला आहे. दरम्यान, नुकताच असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण एक उंचवट्यावरून भयानक स्टंट करताना दिसतोय, जे पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

सोशल मीडियावरील नवनवीन ट्रेंड्सवर अनेकांचे अचूक लक्ष असते. या ट्रेंडनुसार लोक गाणी, रील्स, व्हिडीओ बनवताना दिसतात. सध्या पावसाळा सुरू असून या दिवसात अनेकजण केवळ लाईक्स अन् व्ह्यूजसाठी निसर्गरम्या परिसरात जीवघेणे स्टंट करताना दिसतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही एक तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून जीवघेणा स्टंट करीत आहे. त्यावर अनेक युजर्स कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण एका डोंगराळ स्टंट करण्यासाठी गेला असून यावेळी तो एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर उडी मारतो. या दोन्ही डोंगरांमध्ये खूप मोठी दरी पाहायला मिळते. अशाप्रकारचा जीवघेणा स्टंट एखाद्याच्या जीवावरही बेतू शकतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @manu_na या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत ४७ मिलियनहून अधिक व्ह्युज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स विविध प्रकारच्या कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

या व्हायरल व्हिडीओतील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “भावा, एक दिवस असाच जाशील; जरा सांभाळून.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “असं करू नकोस रे भावा” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “अंगावर काटा आला हे पाहून” चौथ्या युजरने लिहिलेय, “खूपच खतरनाक.”