सोशल मीडियावर सतत नवनवीन आणि आपले मनोरंजन करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता एका चिमुकलीचा संजय दत्तच्या ‘प्यार आ गया रे’ या लोकप्रिय गाण्यावर शाळेच्या गणवेशात डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा डान्स करताना मुलीने केलेल्या हावभाव आणि तिचा गोंडसपणा पाहून तुम्हालाही तिचे कौतुक वाटल्यावशिवाय राहणार नाही.

या गोंडस मुलीने आपल्या डान्सने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. कारण अनेक नेटकरी या डान्सचं कौतुक करत आहेत. काहीजण हा व्हिडीओ रिट्विट करत आहेत. तर काहीजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ @Aarzaai_Ishq नावाच्या ट्टिवटर पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये “खूप सुंदर” असं लिहिलं आहे. सुरुवातीला हा व्हिडीओ लोल नावाच्या इंस्टाग्रामवर पेजवर शेअर करण्यात आला होता.

हेही पाहा- Video: ‘या’ चिमुकलीने सर्वांसमोर असा काही प्रश्न विचारला की, खुद्द दलाई लामांना हसू आवरणं झालं कठीण

व्हिडीओमध्ये एक लहान शाळकरी मुलीने तिच्या स्कुलबसमधून उडी मारते आणि गाण्याच्या तालावर नाचायला सुरुवात करते. ही मुलगी संजय दत्तच्या “प्यार आ गया रे” या चित्रपटातील गाण्यावर अतिशय मनमुराद पद्धतीने डान्स करताना दिसत आहे. ही मुलगी नाचत असताना, तिच्या गोंडस हावभाव आणि उत्कष्ट स्टेप्सनी नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.

हेही पाहा- Video: थंडीपासून बचाव करण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड, अंगावर इतके कपडे घातले की मोजणाराही थक्क झाला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याआधी एका लहान मुलीने पुष्पा चित्रपटातील सामी सामी गाण्यावर असाच भन्नाट डान्स केला होता. ज्याने सोशल मीडियावर सर्वत्र धुमाकूळ घातला होता. अशातच आता या मुलीच्या डान्सने सर्वांना वेड लावलं आहे. या व्हिडीओवर कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी या मुलीचं कौतुक केलं आहे. कमेंटमध्ये एका वापरकर्त्याने लिहिलं आहे की, ‘आजकालची मुलं शिकण्याचे वय एन्जॉय करत आहेत.’ तर आणखी एकाने, ‘ही मुलगी मोठी झाल्यावर नक्कीच चांगली डान्सर होईल असं लिहिलं आहे.