Viral video on social media : सोशल मीडियावर लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी आजकालची तरुणाई काय करेल याचा नेम नाही. कधी कधी तरुणांचे रील्सचे वेड सर्वांसाठीच डोकेदुखी होऊन बसते. सोशल मीडियाने अनेक तरूणांना अक्षरश: वेड लावलं आहे. सोशल मीडियावर रील बनवून अनेकजण प्रसिद्धी मिळवत असतात. तर काहीजण रील बनवण्यासाठी कोणत्या स्तराला जातील याचा काही नेम नाही. सध्या अशाच एका तरूणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिने आपल्या डोळ्यात चक्क लिंबू पिळलं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूणी रील बनवत आहे. कॅमेरा सुरू करून या तरूणीने आपल्या डोळ्यात लिंबू पिळण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यावेळी डोळ्यात लिंबाचे तीन चार थेंब पडले त्यावेळी तरूणीने आरडाओरड करायला सुरूवात केली. लिंबाचे थेंब डोळ्यात पिळल्यामुळे तिच्या डोळ्याची आग झाली असेल.

लिंबू हे एक अॅसिड आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, तरीही या मुलीने केवळ प्रसिद्धीसाठी हे केलं आणि तिच्या ते अंगलट आल्याचं आपण सर्वांनी पाहिलं. यामध्ये कायमचा आंधळेपणा येण्याचीही शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> हाण की बडीव! तरुणीने भररस्त्यात त्याच्या कानाखाली लगावली, तरुणानं थेट बायकोला केला फोन अन्…VIDEO VIRAL

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे सोशल मीडियाचं युग आहे, इथे कधी काय व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. अनेक तरूण-तरूणी भन्नाट व्हिडीओ बनवून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. आजच्या घडीला युवा वर्गात रील्स बनवण्याची क्रेझ वाढली आहे. व्ह्यूज मिळवण्यासाठी अनोख्या गोष्टी केल्या जातात. कधी कधी व्ह्यूजच्या नादात ते आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाहीत. असाच काहीसा प्रकार या व्हिडीओमधून पाहायला मिळाला. अनेकांनी या व्हिडिओला शेअर केलं आहे. तर पापा की परी असं म्हणत अनेक नेटकऱ्यांनी या तरूणीला ट्रोल केलं आहे.