Shocking video : सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारा येतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येकाने वाचले आहे. कारण घाई घाईत नुकसान होण्यापेक्षा संथ गतीनं सुखरुप सगळं व्हावं.. हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरीदेखील काही मंडळी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात अन् पुढे त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. कंपनीत काम करताना एक चुकीचे पाऊल अन् एका मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे.

‘जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर’; आपण जे वागतो, बालतो तेच आपल्यासोबत घडतं हे आपण सगळ्यांनीच आतापर्यंत ऐकलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कळते की दुसऱ्याचे वाईट करण्याचा विचार करू नका, नाहीतर तुमचंही वाईट होईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती कारखान्यात काम करत आहे. यावेळी मशीनमध्ये प्लॅस्टिकचा गोळा लावला आहे आणि प्लॅस्टिक त्या मशीनमध्ये रोल होत आहे. अशातच हा व्यक्ती तिथे येतो आणि ते प्लॅस्टिक बाजूला करतो यावेळी तो मशीनला पाय लावतो आणि तिथेच घात होतो. त्या मशीनमध्ये तो खेचला जातो आणि गोल गोल फिरून त्याचा मृत्यू होतो. आवाज ऐकून एक जण तिथे येतो आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो मशीन बंद करतो. मात्र तो पर्यंत मशीनमध्ये दबल्यामुळे त्याचा मृत्यू होतो.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DMPMU_dqzLY/?utm_source=ig_web_copy_link

हेही वाचा

सोशल मीडियावर हा व्हिडीओ high_fly_44 नावाच्या इन्स्टाग्रावर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. एकानं म्हंटलंय, “कामाला लाथ घातली त्यामुळे हे घडले कर्म म्हणजे परमेश्वर आहे हे विसरला तो घमंडीपणा नडतो…”