Viral video: राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन आणि सुभोशीकरण हा नेहमीच सामाजिक व राजकीय चर्चेचा विषय असतो. त्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेली विरासत म्हणजे हे गड किल्ले आहेत. आजही जगभरातील पर्यटकांचं आकर्षण आणि शिवरायांच्या शौर्याची साक्ष, रक्तरंजीच लढायांचा इतिहास हे गड किल्ले सांगतात. त्यामुळे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांबद्दल प्रत्येकाच्या मनात आदराचं स्थान आहे. मात्र, यापूर्वी काही किल्ल्यांवर मद्यपान,ड्रग्ज घेतल्याच्या घटना आढळून आल्या आहेत. व्यसनाधी तरुणाई गड किल्ल्यांवरील मोकळ्या जागेत असेल कृत्य करतात, अशातच आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये काही तरुण हुक्का ओढत होते. यावेळी काही शिवप्रेमींनी त्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा शिवप्रेमींनी योग्य केलं का?
गेल्या काही वर्षांपासून गड-किल्ले लेण्या आणि पर्यटन स्थळांवर पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी अंमली आणि मादक पदार्थांचे सेवनही केले जाते. सध्या समोर आलेला व्हिडीओ मल्हार गडावरचा असून याठिकाणी हा व्यक्ती मल्हारगडाच्या दरवाज्यावर बसून वेप (हुक्का) ओढत होता. वारंवार समजावूनही तो ऐकत नव्हता. शेवटी वैतागून त्याचा वेप त्याच्यासमोर फोडून टाकण्यात आला. गड-किल्ल्यांची पावित्रता जपणे ही आपली जबाबदारी आहे, आणि अशा लोकांना योग्य तो धडा शिकवणे गरजेचे आहे.असं म्हणत शिवप्रेमींनी या तरुणाला चांगलीच अद्दल घडवल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
राज्यातील प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षांच्या तुरूंगवासाची तसेच एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे तरीही तरुणाई गड किल्ल्यांचे पावित्र्य राखत नाही.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “तिथं प्रेरणा घ्यायचा असतात. व्यसनाधीन नाही. जय शिवराय.” दुसरा म्हणतो, “हुक्का नाही त्या हुक्का पिणाऱ्यांना वरून फेकून दिलं पाहिजे” आणखी एकानं “अशा लोकांना हाकलून लावा गडावरून” अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत लोकांनी संताप व्यक्त केला आहे.