Airtel Gallery Marathi Language: गेल्या काही वर्षापासून परप्रांतिय आणि मराठी भाषा हे वाद मोठ्या प्रमाणात निर्दशनास येत आहे. अशातच मुंबईतून आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. मराठी का आलं पाहिजे? असं कुठे लिहिलं आहे? मराठी येत नसेल तर महाराष्ट्रात राहू शकत नाही असं कुठे लिहिलं आहे? अशी विचारणा दुसरीकडे कुठे नाही तर थेट मुंबईत एका तरुणीने केली आहे. मुंबईच्या चारकोपमधील एअरटेलच्या गॅलरीत कर्मचारी तरुणीचा मराठीतून बोलण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मराठी येणं गरजेचं नाही, अशी उद्दाम तरूणीची भाषा दिसून येत आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

व्हिडीओत मराठी तरुण एअरटेल गॅलरीत उभा असल्याचं दिसत आहे. आपण मागील अर्ध्या तासापासून येथे थांबलो असून, आपली समस्या सोडवली जात नाही. तसंच मराठीत बोलण्यास नकार देत उद्धटपणा केला जात असल्याची तक्रार तो व्हिडीओच्या सुरुवातीला करताना दिसतो. कांदिवलीतील चारकोपमधील एअरटेल कस्टमर केअरमध्ये एक मराठी तरुण त्याची समस्या घेऊन गेला होता. त्यावेळी तेथील महिला कर्मचाऱ्याने त्याच्याशी उद्धट वर्तन केले. संबंधित महिलेला मराठीतून बोलण्यास सांगितले असता तिने हिंदीतून आरडा ओरडा सुरू केला. त्यानंतर या तरुणाने व्हिडिओ काढला ज्यात त्याने महिलेला नीट बोलण्यास सांगितले त्यावेळी तिने उडवा उडवीची उत्तर दिली. ती वरिष्ठांना सांगत होती की हा व्यक्ती मला सांगतो की महाराष्ट्रात आहात तर मराठी बोलले पाहिजे. त्या तरुणाने मराठीचा आग्रह कायम ठेवला तर त्यावेळी ती हुज्जत घालत म्हणाली की, का आले पाहिजे मराठी, कुठे लिहिले आहे. तसेच त्यानंतर त्याने प्रश्न विचारल्यास त्यास हिंदीमध्ये बोलण्यास सांगितले. मला समजत नाही हिंदींमध्ये बोल असे सांगितले. आपण हिंदुस्थानात राहतो. कोणतीही भाषा बोलू शकतो. मराठी महत्त्वाची नाही आहे.असे म्हटले.

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/akhil1485/status/1899464238080405595

योग्य पाऊलं उचला नाहीतर मुंबईत एअरटेलची गॅलरी दिसणार नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडिओवर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला. महाराष्ट्रात एअरटेलचे ग्राहक कायम ठेवायचे असतील तर योग्य पाऊलं उचला नाहीतर मुंबईत एअरटेलची गॅलरी दिसणार नाही.मराठी भाषिक कर्मचारी असायलाच हवे. अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी मांडली. तसेच त्यांनी एअरटेल प्रशासनाची भेट घेतली.