Google Trending Gaurav Taneja Ritu Rathee Divorce Rumors : प्रसिद्ध भारतीय यूट्यूबर आणि फ्लाईंग बीस्ट गौरव तनेजा आणि त्याची यूट्यूबर पत्नी रितू राठी हे सध्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. एकेकाळी जगासमोर खुलेपणाने आपलं प्रेम व्यक्त करणारे हे जोडपे आता घटस्फोट घेणार असल्याचा चर्चा रंगत आहेत. दरम्यान गुगल ट्रेंडवरही आता गौरव तनेजा आणि रितू राठी ट्रेंड होताना दिसत आहे, अनेकजण त्यांच्याविषयी सर्च करत आहेत. याच चर्चांवर गौरव तनेजानंतर आता रितू राठीने मौन सोडले आहे. रितू राठीने ‘डिव्होर्स रिॲलिटी चेक’ नावाने एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात तिने त्यांच्या आठ वर्षांच्या वैवाहिक जीवनाविषयीच्या अनेक गोष्टींची उत्तरे दिली आहेत. रितूने यात तिच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या प्रश्नांवर जोरदारपणे मत मांडले.

gaurav taneja ritu rathee divorce google trend
गौरव तरेजा आणि रितू राठी गुगल ट्रेंड (फोटो – google )

“मी माझ्या मुलांची काळजी घेण्यास सक्षम” घटस्फोटाच्या अफवांवर रितू राठीचे स्पष्ट विधान

रितूने स्पष्ट केले की, जसे प्रत्येक पती-पत्नीमध्ये मतभेद होतात. अगदी त्याचप्रमाणे त्यांच्यातही लहानसहान मतभेद झाले. पती-पत्नीमधील ही छोटीशी चर्चा आहे. त्याला वाटते तो बरोबर आहे आणि मला वाटले मी बरोबर आहे. त्याने हट्टी आहे आणि मीही. पण, बाहेरील लोकांना आमचे नाते समजू शकत नाही. मी त्या व्यक्तीला खूप चांगल्या प्रकारे ओळखते. तो विश्वासू आहे की नाही हे मला तुमच्याकडून ऐकण्याची गरज नाही. मी त्याला सर्व गोष्टींमधून जाताना पाहिले आहे.

अफवा आणि टीकांवर रितूची प्रतिक्रिया

वर्षभरापूर्वी सोशल मीडियापासून दूर राहिलेल्या रितूने या नकारात्मक चर्चांवर नाराजी व्यक्त केली आणि म्हणाली, “जे स्वत: काचेच्या घरात राहतात त्यांना इतरांना टोमणे त्यांच्याबद्दल चर्चा करण्याची खूप आवड असते.” समाजाकडून एखाद्या व्यक्तीला लगेच जज केले जाते, जे वाईट असल्याचे म्हणत तिने नाराजी व्यक्त केली. तसेत लग्नात पूर्वी महिलांना दोष दिला जायचा आणि आता पुरुषांना जबाबदार धरले जात असल्याचेही तिने निदर्शनास आणून दिले.”

gaurav taneja ritu rathee divorce google trend
गौरव तरेजा आणि रितू राठी गुगल ट्रेंड (फोटो – google )

“हा आमचा वैयक्तिक मुद्दा आहे. या जगात असे कोणतेही नाते नाही की, ज्याने तुम्हाला दुखावले नाही आणि तुम्हाला रडवले नाही. माझ्या बाबतीतही तेच झाले होते. पती-पत्नीला मिळून अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. काही वेळा अशा काही गोष्टी असतात, ज्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. यावेळी मला आणि त्यालाही त्रास झाला. मला तुमच्याकडून (सोशल मीडिया युजर्सकडून) त्याच्या तत्त्वांबद्दल ऐकण्याची गरज नाही. तो खरा आहे की नाही किंवा तो एकनिष्ठ आहे की नाही हे कोणीही ठरवायचे नाही.” असेही रितू राठी म्हणाली.

रितू राठी पुढे म्हणाली की, “मला कोणत्याही प्रकारे समाजाच्या पाठिंब्याची गरज नाही. मी काही कमकुवत महिला नाही आणि माझ्यासोबत काहीही चूक झालेली नाही. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. मला या ‘सोशल मीडिया सपोर्ट’ची गरज नाही. तसेच हा मुद्दा पुरुष किंवा स्त्री, असा नाही. आपण सर्व समान आहोत. प्रत्येकाला त्याची मते असतात. फक्त दोन लोक वेगळे झाले आहेत. याचा अर्थ असा नाही की, त्यापैकी एक बरोबर होता किंवा दुसरा चुकीचा. आम्ही दोघेही कधीतरी बरोबर होतो आणि कधीतरी चुकीचेही होतो.”

गौरव तनेजाची प्रतिक्रिया

या अफवांदरम्यान गौरव तनेजानेही २९ सप्टेंबर रोजी घटस्फोटांच्या चर्चांवर इन्स्टाग्रामवर एक निवेदन जारी करून आपले मत मांडले. तिने पोस्टमध्ये लिहिले, “जोई जोई प्यारो करे, सोई मोहे भावे”, म्हणजे “जे माझ्यावर प्रेम करतो, त्यांच्यावर मी प्रेम करतो.” तसेच यात गौरवने आपल्या मुलांना आणि पत्नीला सोशल मीडियावर कोणतेही सार्वजनिक स्पष्टीकरण न देण्याचे आवाहन केले आणि म्हटले, “मी माझ्या मुलांसाठी गप्प राहीन. कृपया कोणत्याही सार्वजनिक स्पष्टीकरणाची अपेक्षा करू नका.”

रितू राठी नेमकी कोण?

रितू राठीचा जन्म हरियाणातील गुडगाव येथे झाला. तिने गुडगावच्या ब्ल्यू बेल्स मॉडेल स्कूल येथून तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले. तर दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेज येथून रसायनशास्त्रात बीएस्सी पदवी प्राप्त केली. रितूने मित्राच्या सांगण्यावरून पायलट होण्याचा निर्णय घेतला आणि या क्षेत्रात प्रवेश करताच क्षणी तिला ते आवडू लागते. तिने अमेरिकेतील अॅरिझोना येथे पायलटचे प्रशिक्षण घेतले.

पाम तेल आरोग्यासाठी अल्कोहोल, धूम्रपानापेक्षाही हानिकारक; एम्स डॉक्टरांचा दावा? Viral मेसेज खरा की खोटा? वाचा

रितूचा पती गौरव तनेजा याने IIT खरगपूरमधून बॅचलरची पदवी घेतली आहे. त्याने पायलट म्हणून प्रथम इंडिगो आणि नंतर एअर एशियामधून करिअरला सुरुवात केली. याचदरम्यान रितू आणि गौरव तनेजाने एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ५ फेब्रुवारी २०२५ रोजी लग्न केले. या दोघांना कैरवी व चैत्रवी अशी दोन मुले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौरव तनेजा हा एक प्रसिद्ध YouTuber आहे; ज्याचे ‘FitMuscle TV’, ‘Flying Beast’ आणि ‘Rasbhari Ke Papa’ या तीन चॅनेलची १.२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.