प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कौशल्य दडलेले असते. फक्त त्यांच्या कलेला वाव देणे महत्त्वाचे असते. कोणाला चित्र काढायला आवडते, कोणाला कविता लिहायला आवडतात, कोणाला गायला आवडते तर कोणाला नृत्य करायला आवडते. नृत्य ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला आनंद देते. नृत्य करणारी व्यक्ती जितक्या आनंदाने नृत्य करते तितकाच आनंद नृत्य पाहणाऱ्यांनाही होतो. सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात जे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. काही लोक इतके अप्रतिम नृत्य करतात की लोकांना पुन्हा पुन्हा पाहूनही समाधान होत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये चंद्रा गाण्यावर एका महिलेने अप्रतिम डान्स करून नेटकऱ्यांना भुरळ पाडली आहे.

नृत्य ही ज्यांना कला अवगत आहे त्यांनी ती जोपासली पाहिजे. पण अनेकदा नोकरी आणि जबाबदारीच्या ओझ्याखाली अनेकांना ती जोपासता येत नाही पण प्रत्येकाला कला जोपासण्याची संधी मिळते त्या संधीचे सोनं करणे हे आपल्याच हातात असते. याचीची प्रचिती देणारा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एका जिल्हा परिषेदच्या महिला कर्मचारीला सांस्कृतिक महोत्सवात आपले नृत्यकौशल्य सादर करण्याची संधी मिळाली आणि तिने त्या संधीचे सोनं केले आहे.

एखाद्या पारंगत नृत्यगणेप्रमाणे या तरुणीने नृत्य सादर केले आहे. गाण्याच्या तालावर अगदी अचूकपणे थिरकत आहे. तिचे नृत्य आणि अदा पाहून नेटकरी घायाळ झाले आहे. नेटकऱ्यांना हे अप्रतिम नृत्य खूप आवडले आहे.

लावणी हे महाराष्ट्रातील हा लोककला नृत्य आहे. लावणी नृत्य वाटते तितके सोपे नाही. चंद्रा चित्रपटातील ‘चंद्रा’ या गाण्यावर चिमुकल्याने लावणी सादर केली आहे. चित्रपटामध्ये चंद्रा उर्फ अभिनेत्री अमृता खानविलकर हिने लावणी नृत्य केले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हे गाणे प्रंचड गाजले होते. या गाण्यावर नाचतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. व्हायरल व्हिडीओमधील तरुणीचे नृत्य पाहून अमृता खानविलकरला ही विसरून जाल.

हेही वाचा – पुण्यातील प्रसिद्ध चॉकलेट भेळ खाल्ली का? Video होत आहे Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडिओ इंस्टाग्रामवर rohitpatilspeaks नावाच्या खात्यावर पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”आम्हीही कलेत कमी नाही. जिल्हा परिषदेच्या अधिकारी सांस्कृतिक महोत्सवात एका महिला कर्मचाऱ्याने चंद्रा या गाण्यावर आपला नृत्य सादर केले .”
व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट केली की,”अभिनंदन मॅडम तुम्ही खुप सुंदर कला सादर केली… आपल्यातील कलेला कोण काय म्हणते याकडे लक्ष न देता न्याय हा दिलाच पाहिजे”