अंकिता देशकर
Zimbabwe Cricketer Heath Streak Death Facts: झिम्बाब्वेचा दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार हीथ स्ट्रीक दीर्घकाळापासून कर्करोगाशी झुंज देत आहे. झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू हेन्री ओलोंगाने स्ट्रीकच्या मृत्यूची बातमी शेअर केल्यानंतर, ही अफवा सगळीच कडे पसरली. २३ ऑगस्ट २०२३ रोजी क्रिकेटर हेल्थ स्ट्रीकबद्दल १ लाखाहून अधिक गूगल सर्च केलेले होते.
हीथ स्ट्रीक, झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अजूनही कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये देशाचा सर्वकालीन सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. कसोटी सामन्यातील १०० बळी आणि १००० कसोटी धावा पूर्ण करणारा तो झिम्बाब्वेचा एकमेव क्रिकेटर आहे. तसेच एकदिवसीय सामन्यात २००० धावा करणारा आणि २०० बळी घेणारा तो देशातील एकमेव खेळाडू आहे. मात्र ICC च्या लाच प्रतिबंधक संहितेचा भंग केल्याचा आरोप स्वीकारल्यानंतर त्याला क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये आठ वर्षांची बंदी घालण्यात आली होती.
अफवा पसरू लागल्यानंतर, आम्ही ‘Google Trends’ द्वारे ‘Heath Streak’ हा शब्द शोधला. Google Trends वर तुम्ही प्रदेश, कालावधी, श्रेणी निवडू शकता. काहीच तासात हीथ स्ट्रीकबद्दलच्या अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरू लागल्या.
झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू हेन्री ओलोंगा याने हीथ स्ट्रीकच्या मृत्यूची बातमी पोस्ट केल्यानंतर अफवा सुरू झाल्या. ओलोंगाने केलेले पहिले ट्वीट होते की, ‘Sad news coming through that Health Streak has crossed to the other side RIP @ZimCricketv legend. The greatest all rounder we produced. It was a pleasure playing with you. See you on the other side when my bowling spell comes to an end.’
या ट्वीटला काहीच वेळात १४०.२K इन्साईट्स मिळाल्या होत्या. ओलोंगाला हीथ स्ट्रीक आणि त्याच्या कुटुंबापर्यंत सहज पोहोचता आले असते, तरी प्रथम माहितीची पडताळणी करण्याऐवजी चुकीची माहिती ट्विटरवर ओलोंगाने दिली. लगेचच इतर क्रिकेटपटू आणि मीडिया संस्थांनी ही बातमी प्रसारित केली यावर आधीच ७०९ पेक्षा जास्त रिट्वीट झाले होते आणि त्यानंतर ही बातमी समोर आली आणि चुकीची माहिती मोठ्या प्रमाणात पसरवली गेली.
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था देखील या बनावट बातमीला बळी पडले आणि पडताळणी न करता हि बातमी त्यांनी उचलून धरली. नंतर कथा मागे घेण्यात आली आणि या वृत्तसंस्थांनी एक निवेदन जारी केले.
भारतातही वीरेंद्र सेहवाग, रविचंद्रन आश्विन अनिल कुंबळे, डेव्ह व्हॉटमोर, वसीम जाफर, दोड्डा गणेश, मुनाफ पटेल आणि इतर अनेकांनी शोकसंदेश शेअर केले.शेवटी, हीथ स्ट्रीकने हेन्री ओलोंगा यांना मेसेज पाठवला की ते जिवंत आहेत, आणि या बातमीचा उलगडा झाला.
हेन्री ओलोंगा यांनीच पुन्हा ट्विटरवर जाऊन हीथ स्ट्रीकच्या आरोग्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर हेन्री ओलोंगा यांनी स्पष्टीकरण जारी केले आणि नंतर हे स्पष्ट झाले की ही चुकीची माहिती होती जी वणव्यासारखी पसरली होती. दुपारपर्यंत हीथ स्ट्रीक हे दोन शब्द सर्वत्र ट्रेंड करत होते, अगदी चांद्रयान 3 च्या तोडीस तोड हा सर्च ट्रेंड सुरु होता. त्यानंतर लगेचच, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर हर्शेल गिब्सने (हीथ स्ट्रीकची मुलगी) होली स्ट्रीक कुकच्या फेसबुक पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला.
होलीचे फेसबुक आणि इंस्टाग्राम प्रोफाईल खाजगी आहे आणि म्हणूनच, फक्त स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला. झिम्बाब्वेच्या एका वृत्तपत्रात, क्रॉनिकल मध्ये, कॅरेन स्ट्रीक, हिथच्या आईने देखील पुष्टी केली की त्यांच्या मुलाच्या मृत्यूची बातमी चुकीची आहे.
ही एक अशी परिस्थिती होती जिथे चुकीची माहिती आणि स्पष्टीकरण दोन्ही मोठ्या प्रमाणात शेअर केले गेले होते आणि त्याऐवजी दोन्हीचा स्त्रोत एकच व्यक्ती होता.