zomato share virat kohli rohit sharma video of happiness on twitter | Loksatta

तेव्हा आम्हालाही असाच आनंद होतो.. झोमॅटोने शेअर केलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, तुम्हीही पोट धरून हसाल

विराट कोहली, रोहित शर्मा आणि हर्षल पटेल विजयावर जल्लोष साजरा करत असल्याचा एक व्हिडिओ झोमॅटोने ट्विटरवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे, झोमॅटोने व्हिडिओला दिलेले कॅप्शन तूफान व्हायरल होत आहे.

तेव्हा आम्हालाही असाच आनंद होतो.. झोमॅटोने शेअर केलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, तुम्हीही पोट धरून हसाल
झोमॅटो

रविवारी भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया संघावर जोरदार विजय मिळवला. सामना जिंकताच क्रिकेट प्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. संघातील खेळाडूंनीही कामगिरीवर समाधान व्यक्त करत आनंद साजरा केला. या दरम्यान विराट कोहली, रोहित शर्मा आणि हर्षल पटेल विजयावर जल्लोष साजरा करत असल्याचा एक व्हिडिओ झोमॅटोने ट्विटरवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे, झोमॅटोने व्हिडिओला दिलेले कॅप्शन तूफान व्हायरल होत आहे. या कप्शनवर नेटकऱ्यांनी तुम्ही पोट धरून हसाल अशी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

झोमॅटोने आपल्या ट्विटर हँडलवर तिन्ही दिग्गज खेळाडूंचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत विराट कोहली, रोहित शर्मा हे पायऱ्यांवर बसले असून काही क्षणातच ते आनंदाने उठून उभे होतात. या आनंदाची तुलना झोमॅटोने आपल्या सेवेशी केली आहे.

(Viral : फळ घ्या फळ.. तरुणाला विमानात अनोख्या पद्धीतीने वस्तू विकताना पाहून पोट धरून हसाल, पाहा व्हिडिओ)

जेव्हा जेवणाचे ऑर्डर पोहोचते तेव्हा मला आणि माझ्या मित्रांना असाच आनंद होतो, अशी भावना झोमॅटोने व्हिडिओ शेअर करत व्यक्त केली आहे. या व्हिडिओला ३० हजारांवर व्ह्यूज मिळाले आहेत. यावर नेटकऱ्यांनी हशा पिकेल अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नेटकऱ्यांनी खूप हसवले

हा व्हिडिओ पाहून पार्सल पोहोचल्यावर होणारा आनंद झोमॅटोने व्यक्त केला. त्यावर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया देत त्यांना असा आनंद कधी होतो याची माहिती दिली आहे आणि ती खूप हसवणारी आहे. एका युजरने झोमॅटोची मजा घेत ते जेव्हा अन्न पदार्थांवर १०० टक्के सूट देतात तेव्हा मला असा आनंद होत असल्याचे म्हटले आहे. एकाने त्याचा मित्र जेव्हा जेवणाचे पैसे देतो, तेव्हा आपल्याला असा आनंद होत असल्याचे म्हणाला. तर एकाने व्हिडिओ पाहून जेव्हा दोघेही सर्व विषयांमध्ये फेल होतात तेव्हा आपल्याला असा आनंद होत असल्याचे म्हटले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
दिवसाचे तब्बल २३ तास फक्त बिछान्यावर असते पडून! महिलेच्या ‘या’ विचित्र अ‍ॅलर्जीमुळे डॉक्टरही पडले गोंधळात

संबंधित बातम्या

लिफ्ट बंद पडताच त्यात तीन लहान मुली अडकल्या अन्…; Viral Video ने वाढवली पालकांची चिंता
Video: लोकलच्या गर्दीत ‘ती’ बाई हट्ट धरून बसली; रेल्वेचालक खाली उतरला अन म्हणाला, “आधी चल.. “
Video: भयंकर! चालत्या बसमध्ये चालकाला आला हार्ट अटॅक; नियंत्रण सुटल्याने बस प्रत्येकाला उडवत सुटली अन…
Viral Video: मगर आली आणि चिमुकल्याला घेऊन गेली, हतबल वडिलांनी डोळ्यादेखत पाहिला मुलाचा दुर्दैवी अंत
Video: नग्नावस्थेत तब्बल २५०० लोकं पोहोचली एकाच ठिकाणी…कारण ऐकाल तर..

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई: शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजप आमदाराचे अज्ञान; विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने दिलगिरी
मुंबई: राज्य औषध व्यवसाय परिषदेला राजकीय कुरघोडीची बाधा
दुर्धर व्याधीग्रस्त रुग्णांसाठी जिल्हास्तरावर विशेष उपचार केंद्र; रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न
मुंबई: गोवरची विशेष लसमात्रा आवश्यकच ;बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण
मुंबई अग्निशमन दलात लवकरच भरती